मुंबई - कोरोना संक्रमण मुंबई शहरात वाढत असून वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेचा विषय बनली असताना मुंबई शहरात कलम 144 , 188 चे नियम लागू करण्यात आलेले आहेत. यानुसार मुंबई पोलिसांनी कलम 188 उल्लंघन करणाऱ्या 306 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.
गेल्या 24 तासात मुंबई शहरात 159 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत 200 आरोपींना नोटीस देऊन पोलिसांनी सोडले आहे. तर 105 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आलेली आहे. कलम 188 नुसार आतापर्यंत गेल्या 24 तासात 50 वाहन ही जप्त करण्यात आलेली आहेत.
दक्षिण प्रादेशिक विभाग -
गेल्या 24 तासात दक्षिण प्रादेशिक विभागात 38 गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये 84 आरोपींचा समावेश आहे. आतापर्यंत यातील 82 आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आलेले असून 2 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. दक्षिण प्रादेशिक विभागात तब्बल 39 वाहन विनाकारण रस्त्यावर फिरत असल्या कारणाने जप्त करण्यात आलेली आहेत.
मध्य प्रादेशिक विभागात पोलिसांनी 4 आरोपींवर चार गुन्हे दाखल केलेले आहेत. तर पूर्व प्रादेशिक विभागात 19 गुन्हे दाखल करण्यात आले असून पश्चिम प्रादेशिक विभागात 80 तर उत्तर प्रादेशिक विभागात 12 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.