मुंबई: मुंबई महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयात वॉर रूम सुरू आहेत. Mumbai Municipal Corporation सुरुवातीला नागरिकांच्या तक्रारी या वॉर रूममध्ये स्वीकारल्या जात होते. आता नागरिकांच्या रोजच्या जीवनात आरोग्यविषयक सोयी सुविधांची माहिती या वॉर रूमद्वारे दिली जात आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन विभाग: मुंबईत आगी लागणे, घर इमारत दरड कोसळणे अशा आपत्तीच्या अनेक घटना घडतात. अशावेळी नागरिकांना तातडीने मदतकार्य पोहचवण्याचे काम पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून केले जाते. त्यासाठी पालिकेने १९१६ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. त्याच सोबत फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियावर आलेल्या तक्रारींची नोंद या विभागाकडून घेवून सबंधित विभागांना आणि अधिकाऱ्यांना पोहचवण्याचे काम आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून केले जाते. असेच काम पालिकेच्या २४ विभाग कार्यालयात असलेल्या वॉर रूमकडून केले जात आहे.
वॉर्ड वॉर रूम: मुंबईत गेल्या अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार सुरू झाल्यावर रुग्ण संख्या वाढू लागली. पालिका मुख्यालयात असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागवार असलेला ताण कमी करण्यासाठी २४ विभागातील वॉर रूमवर बेडचे वाटप, रुग्णवाहिका, कोरोना रुग्णांशी संपर्क आदी कामे सोपवण्यात आली. यामुळे त्या विभागात राहणाऱ्या नागरिकांना विभागातच कोरोना काळात सर्व सोयी सुविधा वेळेवर मिळाल्याने मृत्यूंची संख्या रोखण्यात पालिकेला यश आले. विभागात एखादी आपत्कालीन घटना घडल्यास वॉर्ड वॉर रूममधून नागरिकांना तात्काळ मदत मिळू लागली आहे.
आरोग्याशी संबधित माहिती कळवा: त्यानंतर आता नागरिकांना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणे. कोणत्या रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत. याची माहिती देणे, कोविड चाचणी केंद्र कुठे आहे. लसीकरण केंद्राची माहिती उपलब्ध करुन देणे, रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नसल्यास रुग्ण अथवा रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आल्यास तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे आदी कामे वॉर्ड वॉररूमच्या माध्यमातून केली जात आहेत. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी दिली आहे. आरोग्यासंदर्भात कोणतीही मदत हवी असल्यास नागरिकांनी वॉर रूमकडे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
वॉर्ड वॉर रूमशी संपर्क साधा ए - ०२२-२२७००००७, बी - ०२२-२३७५९०२३, सी - ०२२-२२१९७३३१, डी - ०२२-२३८३५००४, ई - ०२२-२३७९७९०१, एफ/दक्षिण ०२२-२४१७७५०७, एफ/ उत्तर ०२२-२४०११३८०, जी/दक्षिण ०२२-२४२१९५१५, जी/उत्तर ०२२-२४२१०४४१, एच/पूर्व ०२२-२६६३५४००, एच/पश्चिम ०२२-२६४४०१२१, के/पूर्व ०२२-२६८४७०००, के/पश्चिम ०२२-२६२०८३८८, पी/दक्षिण ०२२-२८७८०००८, पी/उत्तर ०२२-२८४४०००१, आर/दक्षिण ०२२-२८०५४७८८, आर/उत्तर ०२२-२८९४७३५०, आर/मध्य ०२२-२८९४७३६०, एल ०२२-२६५०९९०१, एम/पूर्व ०२२-२५५२६३०१, एम/पश्चिम ०२२-२५२८४०००, एन ०२२-२१०१०२०१, एस ०२२-२५९५४०००, टी ०२२-२५६९४०००