मुंबई : राफेल विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार चोर है अशी जाहीर टीका ( Rahul Gandhi Chowkidar Chor Hai Statement ) केल्यामुळे दाखल झाला होता. मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या याचिकावर आज न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. दरम्यान राहुल गांधी यांना 25 जानेवारीपर्यंत दिलासा कायम ठेवत कुठलेही प्रकारची कारवाई करू नये असे निर्देश गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाला देण्यात आले ( Bombay High Court Grants Relief To Rahul Gandhi )आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी होणार ( Next Hearing On January 20 ) आहे.
याचिकेवर पुढे सुनावणी ठकलली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात ( Rahul Gandhi Statement On PM Narendra Modi ) आज सुनवणी झाली. दोन्हीही पक्षकारांकडून कोणीही उपस्थित नसल्याने या याचिकेवर पुढील सुनावणी करिता तारीख देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी 20 जानेवारी पर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.
प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश : राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्याने गिरगाव न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत गिरगाव न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स बजावत प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राहुल यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. महेश श्रीमल यांनी मानहानीची तक्रार केली आहे. ही तक्रार रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज राहुल गांधी यांनी वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे.
काय आहे राहुल गांधींची याचिका : राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याच्या आरोप करत राहुल गांधींविरोधात मुंबईत साल 2019 मध्ये मानहानीचा खटला दाखल झाला आहे. या दाव्यावर फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले असून त्याबाबत राहुल गांधींना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले गेले होते. याचप्रकरणी दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण : राहुल गांधी यांनी राफेलबाबत टीका करताना मोदी यांच्यावर कमांडर इन थीफ चौकिदार चोर है चोरो का सरदार अशी टीका केली होती. यामुळे मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टी व त्यातील सदस्यांचीही प्रतिम मलिन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या विधानांमध्ये या याचिकेत समावेश आहे. तक्रारदार हे भाजपचे सदस्य असल्यामुळे ते अशाप्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना आहे असं मत व्यक्त करत या गिरगाव दंडाधिकारी कोर्टानं याची दखल घेत राहुल गांधींच्या नावे समन्स जारी केलं होतं. याशिवाय राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी आणि शिवडी न्यायालयातही मानहानीच्या तक्रारी प्रलंबित आहेत.
राहुल गांधींचे नारे : 20 सप्टेंबर 2018 रोजी जयपूरच्या एका सभेत राहुल गांधींनी गली गली मे शोर है हिंदुस्तान का चौकीदार चोर है असा नारा दिला होता. तसेच 24 सप्टेंबरला एक ट्विट करून राहुल गांधींनी मोदींना उद्देशून अपमानकारक मानहानीकारक विधानं केली होती. ज्यामुळे तमाम भारतीयांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन झाल्याचा दावा या तक्रारीतून करण्यात आला आहे. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्याबाबतीत अशी विधान करून राहुल गांधींनी भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांचाही अपमान केला आहे. असा दावा या याचिकेतून करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.