ETV Bharat / state

क्षयरोग, कुष्‍ठरोग नियंत्रणासाठी महापालिका सज्ज; घरोघरी जाऊन करणार तपासणी

author img

By

Published : Nov 29, 2020, 3:54 PM IST

बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात क्षयरोग व कुष्‍ठरोग नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी महापालिकेचा सार्वजनिक आरोग्‍य विभाग सातत्‍याने प्रयत्‍नशील आहे. याच प्रयत्‍नांचा भाग म्‍हणून येत्‍या १ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२० दरम्‍यान राबविण्‍यात येणाऱ्या एका संयुक्‍त मोहिमेदरम्‍यान महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे पथक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे.

bmc News
बृहन्‍मुंबई महापालिका

मुंबई - बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात क्षयरोग व कुष्‍ठरोग नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी महापालिकेचा सार्वजनिक आरोग्‍य विभाग सातत्‍याने प्रयत्‍नशील आहे. याच प्रयत्‍नांचा भाग म्‍हणून येत्‍या १ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२० दरम्‍यान राबविण्‍यात येणाऱ्या एका संयुक्‍त मोहिमेदरम्‍यान महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे पथक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे. ही तपासणी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या कालावधी दरम्‍यान केली जाणार आहे. तरी नागरिकांनी तपासणी पथकास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले.

३ हजार ४५१ पथके -

या अभियानांतर्गत क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्‍या परिसरामधील साधारपणे १२ लाख १२ हजार ६९३ घरातील ५० लाख ९ हजार २७७ व्‍यक्‍तींची क्षयरोग व कुष्‍ठरोग तपासणी करण्‍यात येणार आहे. या अभियानासाठी महापालिकेची ३ हजार ४५१ पथके कार्यरत असणार आहेत. या पथकांद्वारे त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील घरांना प्राधान्‍याने सकाळी ९ ते सायंकाळी ४ या दरम्‍यान भेटी देऊन क्षयरोग व कुष्‍ठरोग विषयक वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तथापि, घरातील व्‍यक्‍ती कामानिमित्‍त किंवा इतर कारणांसाठी बाहेर असल्‍यास पथक दिवसातील इतर वेळी देखील भेट देऊन तपासणी करू शकेल.

तपासणीसाठी व्हाऊचर -

प्राथमिक तपासणी दरम्‍यान आढळणाऱ्या क्षयरोग संशयित रुग्‍णांची तपासणी करण्यासह क्ष-किरण चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी संशयित रुग्णांच्या परिसराजवळ असणाऱ्या बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या सरकारी प्रयोग शाळेत मोफत केली जाणार आहे. तसेच, क्ष-किरण चाचणी देखील निर्धारित करण्‍यात आलेल्‍या खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये मोफत केली जाणार आहे. निर्धारित करण्‍यात आलेल्‍या खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये मोफत तपासणी करता यावी यासाठी संशयित रुग्‍णाला विशेष 'व्‍हाऊचर' देण्‍यात येणार आहे, ज्‍यामुळे संशयित रुग्‍णाला खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये जाऊन मोफत चाचणी करवून घेता येणार आहे.

अभियनादरम्‍यान चाचणी केल्‍यानंतर क्षयरोगाची बाधा आढळून आलेल्‍या रुग्णांना मोफत औषधोपचार दिले जाणार आहेत. याच अभियनादरम्‍यान आढळून येणाऱ्या कुष्ठरोग संशयितांना नजिकच्‍या दवाखान्‍यात किंवा रुग्‍णालयात संदर्भित करण्‍यात येणार आहे. कुष्‍ठरोग संशयितांची तपासणी ही वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्‍यात येणार आहे.

क्षयरोगाची लक्षणे कोणती -

१४ दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असणे, दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ ताप असणे किंवा सायंकाळच्‍या वेळेस ताप येणे, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकीमधून रक्‍त पडणे, छातीत दुखणे, मानेवर सूज असणे, ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळून आल्‍यास संबंधिताने तातडीने महानगरपालिकेच्‍या किंवा सरकारी रुग्‍णालयातून क्षयरोगाची चाचणी करवून घ्‍यावी. ही चाचणी पूर्णपणे मोफत आहे, अशी माहिती महापालिकेच्‍या कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. गोमारे यांनी दिली.

रुग्ण, कुटुंबाने काळजी घ्यावी -

ज्‍यांच्‍या कुटुंबामध्‍ये एखाद्यास क्षयरोगाची बाधा झाल्‍याचा इतिहास आहे किंवा ज्‍यांना यापूर्वी क्षयरोगाची बाधा झाली होती, अशा व्‍यक्‍तींनी क्षयरोगाच्‍या लक्षणांबाबत अधिक जागरुक असणे अत्‍यंत गरजेचे आहे. ज्‍यांना क्षयरोगाची बाधा झालेली आहे, त्यांनी औषधोपचाराचा कोर्स नियमितपणे व योग्‍य प्रकारे पूर्ण केल्‍यास क्षयरोग बरा होऊ शकतो. मात्र, यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्‍या पद्धतीनेच औषधोपचार घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.

तसेच, त्‍वचेवर फिकट लालसर चट्टा असणे, त्‍या ‍ठिकाणी घाम न येणे, जाड–बधीर तेलकट चकाकणारी त्‍वचा, कानाच्‍या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर व तळपायांवर मुंग्‍या येणे, बधीरपणा व जखमा असणे, त्‍वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, हात व पायांमध्‍ये अशक्‍तपणा जाणवणे, हातातून वस्‍तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे इत्‍यादी लक्षणे आढळून आल्‍यास संबंधिताने तातडीने महापालिकेच्‍या व सरकारी रुग्‍णालयातून कुष्‍ठरोगाची तपासणी करवून घ्‍यावी. कुष्ठरोगाचे लवकर निदान करून औषधोपचार चालू केल्‍यास होणारे शारीरिक व्‍यंग टाळता येते, अशी माहिती महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे तपासणी अभियानाच्‍या निमित्‍ताने देण्‍यात येत असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले.

हेही वाचा - धारावीत लिफ्टमध्ये अडकून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.