ETV Bharat / state

BBC Documentary on PM : 'पंतप्रधानांच्या बदनामीचा प्रयत्न करू नये, डॉक्युमेंटरी दाखवल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल'

author img

By

Published : Jan 28, 2023, 4:21 PM IST

एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर डॉक्युमेंटरी तयार केली. या डॉक्युमेंटरीचे चित्रण टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स या संस्थेत दाखवले जाणार आहे. अशी माहिती मिळताच भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी डॉक्युमेंटरी दाखवल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराच दिला.

BBC Documentry on Modi
आमदार आशिष शेलार

आमदार आशिष शेलार यांनी दिला इशारा

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर तयार केलेली डॉक्युमेंटरी TISS संस्थेत दाखवल्यास भारतीय जनता पक्ष आपली भूमिका घेईल असा इशाराच दिला आहे. ट्विटच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी हा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तयार केलेली ही डॉक्युमेंटरी मुंबईत दाखवल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. कायदा शिवसेनेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी तातडीने या चित्रकर्णावर बंदी घालावी असेही आपल्या ट्विट मधून आशिष शेलार यांनी सांगितला आहे.

डॉक्युमेंटरी भारतामध्ये लीक : द मोदी क्वेशन नावाच्या माहितीपटातून गुजरात दंगलींबाबत देखील चित्रकार करण्यात आलेला आहे. ज्यावेळी गुजरात मध्ये दंगली उसळल्या होत्या. त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे होते. मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची भूमिका संशयास्पद होती असे या डॉक्युमेंटरी मधून दाखवण्यात आले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांकडून करण्यात येत आहे. ही डॉक्युमेंटरी विदेशात प्रसिद्ध झाले असली तरी भारतामध्ये तिला प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. मात्र तरीही ऑनलाइन माध्यमातून जी डॉक्युमेंटरी भारतामध्ये लीक झाली आहे.

प्रतिमेला तडा जाईल असे चित्रीकरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित एका नामांकित वृत्तसंस्थेने डॉक्युमेंटरी तयार केली आहे. या डॉक्यूमेंटरी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला तडा जाईल असे चित्रीकरण करण्यात आलेला आहे. त्यामुळे या डॉक्युमेंट्रीला भारतीय जनता पक्षाने चांगलाच विरोध केला आहे. दिल्लीतील जे एन यु संस्थेत देखील या डॉक्युमेंटरी दाखवण्यावरून विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता. तोच वाद आता मुंबईत देखील पाहायला मिळतोय. मुंबई टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेत डॉक्युमेंटरी दाखवण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. ही डॉक्युमेंटरी दाखवू नये यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र ही डॉक्युमेंटरी दाखवल्यास भारतीय जनता पक्ष आक्रमक होईल. आज भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाकडून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेवर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.

डॉक्युमेंटरी स्क्रिनिंगला विद्यापीठाचा विरोध : डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग रात्री 9 वाजता सुरू होणार होती. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून याला परवानगी नाकारण्यात आली होती. विद्यापीठाच्या आदेशाला न जुमानता विद्यार्थ्यांनी माहितीपट दाखवण्याचा निर्णय घेतला. जेएनयू प्रशासनाने स्क्रीनिंगला परवानगी दिली नाही. तसेच डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगनंतर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही सांगितले. विद्यार्थ्यांनी आग्रह धरला की स्क्रीनिंगमुळे कोणत्याही विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही किंवा जातीय सलोखा बिघडणार नाही.

टीसने पंतप्रधानांच्या बदनामीचा प्रयत्न करू नये -एडवोकेट शेलार : बीबीसी ने तयार केलेल्या डॉक्युमेंटरीद्वारे असत्य आणि अपप्रचार केला जात आहे. टिस सारख्या संस्थेने अथवा तेथील विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने पंतप्रधानांचा अपप्रचार करू नये, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने वागावे लागेल, असा इशारा भाजपाचे मुंबई अध्यक्ष शेलार यांनी दिला आहे.

मोदी यांच्या बदनामीचा मुद्दाम प्रयत्न : बीबीसीची बोगस डॉक्युमेंटरी आहे आणि हा अपप्रचार आणि असत्य बीबीसी ने काढलेल्या या डॉक्युमेंटरी वर एका सरकारी खात्याने कारवाई केल्यानंतरही जर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेने किंवा तेथील काही विद्यार्थ्यांनी जर हा शो दाखवण्याचा प्रयत्न केला असेल. ज्यामध्ये विशिष्ट धर्मीय संघटनेची लोक आहेत अशी आमची माहिती असून यामुळे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहेत. अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार शेलार यांनी व्यक्त केली आहे. म्हणून यासंदर्भात वेळीच कारवाई करावी अशी पोलिसांना विनंती केली आहे, नाहीतर माननीय मोदी यांच्या बदनामीचा प्रयत्न मुद्दाम केला जातोय जे असत्य पसरवले जाते आहे. दुष्प्रचार केला जातो आहे ज्या भावना भडकवले जातात त्यावर आम्ही आमचा निर्णय झाला मोकळे आहोत अशा शब्दात शेलार यांनी इशारा दिला आहे.

टीस च्या संघटनांनी राजकारणात यावे : टीसने हे धंदे बंद करावेत त्यांच्या ज्या काही संघटना असतील त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी थेट राजकारणात यावे असे आव्हानही शेलार यांनी यावेळी दिले. समोरून आमचा सामना करावा सामनाच्या आड जाऊन या संघटनांनी वार करू नये असेही ते म्हणाले. राज्यपालांसारख्या व्यक्तीवरील जाहीर वक्तव्य मोठ्या पदांवरील व्यक्तींनी टाळावेत असा तुलाही त्यांनी शरद पवार यांना यावेळी लगावला.

आदित्य ठाकरे यांना उशिरा सुचलेले शहाणपण : जनता आपल्याला आता प्रश्न विचारेल म्हणून आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेल्या त्यांना आता शहाणपण सुचलेल आहे. वास्तविक हा प्रश्न भारतीय जनता पक्षाने आधीच हाती घेतला आहे असे शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिली आहेत आयुक्तांना भेटलो त्यानंतर आयुक्तांनी प्रस्ताव आणला आहे आता आदित्य ठाकरे वराती मागून घोड दामटवत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

18000 कोटी रुपयांच्या तिजोरीवर डल्ला : बांधकाम व्यवसायातून निर्माण होणारी धूळ हे मुख्य कारण प्रदूषणाचे आहे याच वर्षीही धूळ का निर्माण झाली याचाही शोध घेतला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या 18000 कोटी रुपयांच्या तिजोरीवर डल्ला मारून मुंबईतील बिल्डरांना अधिक प्रीमियम देऊन बांधकाम करायला दिल्यामुळेच हा प्रश्न निर्माण झाल्याचेही शेलार म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या काळात या परवानगी दिल्या गेल्याने बांधकामे सुरू झाली. केंद्रीय यंत्रणांना त्यांची कामे निष्पक्ष पणाने करू दिली गेली पाहिजे तशी ती करू दिली गेली तरच देशाचे भले होईल असेही शेलार म्हणाले

हेही वाचा : BBC Documentary On Modi : जेएनयूत पंतप्रधानांवरील डॉक्युमेंट्री स्क्रीनिंग असताना वीजपुरवठा खंडित, विद्यार्थ्यांची प्रशासनाविरोधात निदर्शने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.