ETV Bharat / state

मराठा आरक्षण आणि छत्रपतींच्या सन्माना संदर्भात भाजपला शिकवू नका - प्रवीण दरेकर

मराठा समाजाला भाजपने आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपनेच केले असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर
author img

By

Published : May 26, 2021, 7:25 PM IST

मुंबई - मराठा समाजाला भाजपने आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपनेच केले. त्यामुळे मराठा आरक्षण आणि छत्रपतींच्या सन्माविषयी कोणीही भाजपला शिकवण्याची गरज नाही, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

1999 पासून काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस यांची पंधरा वर्षे राज्यात तर दहा वर्षे केंद्रात सत्ता होती. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याऐवजी मराठा कार्यकर्त्यांना मारझोड करण्याचेच काम तुमच्या सरकारने केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिले व ते हायकोर्टातही टिकवले. आमचे सरकार होते तोपर्यंत सुप्रीम कोर्टातही त्याला स्थगिती आली नाही. हे सगळे करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते. त्यांना मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू चांगली समजते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

ज्यांना मराठा समाजाचे असलेले आरक्षण टिकवता आले नाही. त्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी चंद्रकांतदादांना आरक्षणाची कायदेशीर बाजू शिकवू नये. मराठा समाजाला कायदेशीर पद्धतीने आरक्षण कसे द्यायचे आणि ते कोर्टात कसे टिकवायचे आम्हाला चांगले समजते. तुम्हाला जमले तर आता किमान सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका तरी दाखल करा, असा टोला त्यांनी हाणला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.