ETV Bharat / state

BJP Attempt Snatch Hindutva : शिवसेनेकडून हिंदुत्व हिसकावण्याचा भाजपचा प्रयत्न - आप - Chandrakant Patil

भाजप शिवसेनेकडून हिंदुत्व हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही, हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचा काहीही संबंध नसल्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटालाही फटका बसू शकतो, असा दावा आपचे प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी केला आहे.

BJP Attempt Snatch Hindutva
BJP Attempt Snatch Hindutva
author img

By

Published : Apr 11, 2023, 3:59 PM IST

Updated : Apr 11, 2023, 4:22 PM IST

धनंजय शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई : बाबरी मशिदीचा ढाचा कार सेवकांनी पाडला. त्याचा शिवसेनेची काहीही संबंध नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी ढाच्या पाडल्याची कुठेही नोंद नाही, असे अतिशय धक्कादायक वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. 1992 मध्ये पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीच्या ढाच्या प्रकरणातील जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वीकारली होती. ढाच्या पाडण्यामध्ये शिवसैनिकांचा हात असेल तर, त्याचा आपल्याला अभिमान आहे, अशा शब्दात त्यांनी या घटनेचे समर्थन करीत जबाबदारीही स्वीकारली होती. त्यामुळे शिवसेनाच्या हिंदुत्वाचे नाते अधिक दृढ आणि घट्ट झाले होते. तेव्हापासूनच शिवसेनेकडे कट्टर हिंदुत्ववादी संघटना म्हणून पाहिले जाते.

शिवसेनेची ओळख पुसण्याचा कार्यक्रम : मात्र कट्टर हिंदुत्ववादी संघटना ही शिवसेनेची असलेली ओळख भाजपाला पुसून काढायची आहे. भाजपा हाच केवळ हिंदुत्ववादी पक्ष आहे. तोच सत्तेच्या केंद्रस्थानी राहावा यासाठी हा सर्व आटापिटा असल्याचा दावा आपचे राज्य सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी केला आहे. शिवसेनेकडून हिंदुत्व हिसकावून घेण्यासाठी भाजप हर तऱ्हेने प्रयत्न करीत आहे. मग ते सावरकरांच्या माफी नाम्यावरून असेल अथवा महाविकास आघाडी सोबत शिवसेना गेल्याने शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची केली. मात्र, तरीही शिवसेना हिंदुत्व या विरोधावलीला चिकटून राहिल्यामुळे त्यांच्याकडून हिंदुत्व हिसकावून घेण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य केले आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली.

शिंदे गटालाही बसणार फटका : शिवसेना शिंदे गटही आपण कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आपणच कसे हिंदुत्वाशी जोडले गेलो आहोत हे सांगत आहे. जर बाबरी मशिदीचा ढाच्या पाडणारे शिवसैनिक नाही असे, वक्तव्य भाजपच्या मंत्र्यांनी केले असेल तर, अप्रत्यक्षरीत्या शिवसेना शिंदे गटातील तत्कालीन नेतेही हिंदुत्ववादाशी जोडले जाणार नाहीत. त्यामुळे त्याचा फटका आपसूकच शिंदे गटातील हिंदुत्ववादी नेत्यांना बसणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा - Aditya Thackeray met Telangana IT Minister : आदित्य ठाकरे यांनी घेतली तेलंगणाचे आयटी मंत्री केटीआर यांची भेट

Last Updated : Apr 11, 2023, 4:22 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.