ETV Bharat / state

Atul Londhe On Yogi Adityanath धार्मीक कट्टरता असलेल्या उत्तरप्रदेशात कोण गुंतवणूक करणार, अतुल लोंढेंचा योगी आदित्यनाथांवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Atul Londhe Criticize To CM Yogi Adityanath ) हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde ) आणि देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांची भेट घेतली. उद्योगपतींनी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासाठी ते आज मुंबईतील उद्योगपतींच्या गाठीभेटी घेणार आहेत. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress Leader Atul Londhe ) यांनी उत्तर प्रदेशात कोण गुंतवणूक करणार असा खोचक सवाल योगी आदित्यनाथांना केला आहे.

Atul Londhe On Yogi Adityanath
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे
author img

By

Published : Jan 5, 2023, 5:22 PM IST

Updated : Jan 5, 2023, 5:52 PM IST

मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Atul Londhe Criticize To CM Yogi Adityanath ) मुंबईच्या दौऱ्यावर असून ते उद्योगपती आणि बॉलीवूड कलाकारांच्या भेटी घेत आहेत. उत्तर प्रदेशात उगोगांनी गुंतवणूक करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असला तरी धर्मांधता असलेल्या उत्तर प्रदेशात कोण गुंतवणूक करणार असा सवाल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress Leader Atul Londhe ) यांनी विचारला आहे. आधी गव्हर्नन्स सुधारा मग गुंतवणुकीची अपेक्षा करा, असा सल्लाही लोंढे यांनी दिला आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे

आपण धर्मांधता पसरवता योगी आदित्यनाथजी मुंबईतच काय पण संपूर्ण देशभर आणि जगात जरी फिरले तरी उद्योगपतींनी आपल्या येथे उद्योग ( Business Investment In UP ) का आणावेत हा प्रश्न कायम राहणार आहे. आपण धर्मांधता पसरवता, धार्मिक दुही माजवता, जाती-जातींमध्ये भेद करता, आपल्या येथे कायदा सुव्यवस्था एकदम वाईट परिस्थितीमध्ये आहे. त्यामुळे आपल्या येथे उद्योगांनी काय यावे हा प्रश्न आहे. आमचीही इच्छा आहे, उत्तर प्रदेशातून अनेक बांधव महाराष्ट्रात नोकरीसाठी रोजगारासाठी येतात. त्यांना फार कष्ट करावे लागतात. त्यांना त्यांच्या राज्यात नोकरी, रोजगार ( Congress Leader Atul Londhe Criticized To CM ) मिळाला तर त्यांचे अनेक प्रश्न सुटतील. पण हे कसे होणार, कारण तुम्ही वातावरण इतके वाईट करून ठेवले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात उद्योग कसे येणार असा टोला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावला आहे.

बॉलीवूड कामाच्या जोरावर उभे राहते बॉलीवूड उत्तर प्रदेशात यावे अशी आपली अपेक्षा आहे. मात्र बॉलीवूड हे सर्व धर्म समभाव, गुणवत्ता आणि अभिनयाच्या जोरावर चालणारे क्षेत्र आहे. बॉलीवूडमधील कोण कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा कुठल्या पंथाचा हे पाहिले जात नाही. तिथे केवळ काम पाहिले जाते. त्यामुळे बॉलीवूड आपल्याकडे का येईल, असा सवालही अतुल लोंढे यांनी यावेळी विचारला. सगळ्यात आधी आपण आपला गव्हर्नन्स सुधारा मगच इतरांकडून गुंतवणुकीची अपेक्षा करा, अशी टीकाही लोंढे यांनी योगी आदित्यनाथांवर केली आहे.

योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी ते काही उद्योगपतींच्याही गाठीभेटी घेणार आहेत.

Last Updated : Jan 5, 2023, 5:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.