मुंबई : मुंबईतील बेस्टने वीज दरवाढ अन्यायकारक आहे. अशी भूमिका घेत मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी त्यावेळी बेस्ट महाव्यवस्थापकाच्या मुख्य कार्यालयात आंदोलन केले होते. या आंदोलनात बेस्टच्या महाव्यवस्थापकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्यावर केला गेला होता. तसा मुंबईत पोलिसात गुन्हा देखील झाला आहे. याबाबत सत्र न्यायालयामध्ये संदर्भात सुनावणी झाली. अनेकदा सुनावणी वेळी दोन्ही मंत्री हजर नव्हते, परंतु आज त्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले गेले होते. त्यामुळे त्यांनी सत्र न्यायालयात हजेरी लावली आहे.
सुनावणी वेळी हजर राहिले नाही: याआधी डिसेंबर 2022 मध्ये राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे सुनावणी वेळी हजर राहिले नाही. म्हणून त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले गेले होते. तसेच मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांच्या वकिलांना त्यावेळी सत्र न्यायालयाने देखील ताशेरे ओढले होते. एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये त्यांची सुनावण्याची तारीख न्यायालयाने निश्चित केली होती, परंतु त्यावेळी देखील राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभाती लोधा यांनी हजेरी लावलेली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन त्यावेळी निर्देश दिले होते की, चार मे 2023 रोजी आपल्याला न्यायालयात हजर राहणे अत्यावश्यक आहे.
हे गुन्हे नोंदवलेले आहेत: कोरोना महामारीच्या काळामध्ये मुंबईतील अनेक नागरिकांना वीज दरवाढ सोसावी लागली. अनेकांना जादा रकमेचे वीज बिले प्राप्त झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. अशी भूमिका घेत या वीज दरवाढी विरोधात राहुल नार्वेकर यांनी त्यावेळेला आंदोलन केले होते. बेस्टच्या महाव्यवस्थापकांच्या कार्यालयामध्ये त्यांनी धुडगूस घातली धक्काबुक्की, मारहाण केली, या प्रकारचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता. राहुल नार्वेकर यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 143 हल्ला करणे, चिथावणी देणे, 147, 353 एखाद्याला जबर दुखापत करणे, 332 इच्छित माणसाच्या ऐवजी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, 341 सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, 49 तसेच 188 निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडणे किंवा तोतयागिरी करणे. तसेच 427 म्हणजे 504 दुखापत करणे, हमलाची पूर्व तयारी करणे , गृह अतिक्रमण करणे, शिवाय महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 या अंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे. तसेच सरकारी संपत्ती नुकसान कायदा या अंतर्गत देखील त्यांच्यावर काही कलमे लावण्यात आलेली आहे.
संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर दोन्ही आमदारांच्यासह इतर वीस व्यक्ती विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या खटल्याची सुनावणी नियमितपणे सुरू असते, परंतु अनेक तारखांच्या वेळी दोन्ही मंत्री हजर नसल्याने मागच्या वेळी अक्षरशः न्यायालयाने तंबी दिली होती की, हजर राहणे अनिवार्य आहे. त्यामुळे आज हजेरी लावली. न्यायालयाने दोन्ही लोकप्रतिनिधींची हजेरी घेतली. त्यानंतर न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली आहे. तर पुढील सुनावणी 19 जून रोजी निश्चित केली.