मुंबई - राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कमी असेल, तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. अधिवेशन चालू झाल्यावर विरोधी पक्षनेते पदावर निर्णय होईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली आहे. आमच्यातील 9 आमदार सत्ताधाऱ्यांकडे गेले आहेत. त्यामुळे आमचा पक्ष सध्या कागदावरच मोठा दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे दिली असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
विरोधी पक्षाचा कार्यभार काँग्रेसकडे - सोमवारपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. याआधी राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने विरोधी पक्षनेते पद हे राष्ट्रवादीकडे होते. मात्र, बंडानंतर राष्ट्रवादीकडील संख्याबंळ कमी झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुरुच आहे. यावर रविवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसकडे देण्यात आल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. आम्ही फक्त आता कागदावरच सर्वात मोठा पक्ष आहोत. खरी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसकडे दिली असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका महत्वाची - विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येणार आहेत. राष्ट्रवादीतील आमदार या पावसाळी अधिवेशनात किती आक्रमक होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बंडखोर आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट - रविवारी सकाळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री वायबी चव्हाण सेंटरला पोहोचले. अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता.
हेही वाचा -