ETV Bharat / state

Fit India Quiz: हृदयविकाराच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ, खेळांच्या मैदानावर तरुणांना नेणे हा एकमेव उपाय-अनुराग ठाकूर

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 72 शालेय विद्यार्थ्यांचा फिट इंडिया क्विझ राज्य फेरीच्या दुसऱ्या आवृत्तीत यश मिळवल्याबद्दल सत्कार केला. फिट इंडिया क्विझच्या पहिल्या आवृत्तीच्या यशानंतर दुसऱ्या आवृत्तीला मोठा प्रतिसाद मिळाला.

author img

By

Published : Jul 24, 2023, 8:30 AM IST

Anurag Singh Thakur
अनुराग सिंह ठाकूर

मुंबई : देशातील 72 विद्यार्थ्यांनी फिट इंडियात यश मिळविले आहे. हे विद्यार्थी फिट इंडिया क्विझच्या राष्ट्रीय फेरीत भाग घेणार आहेत. प्रत्येक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील विजेत्या शाळेला एकूण 2.5 लाख रुपयांचे बक्षीस रक्कम वितरित करण्यात आले. तर शाळेतील 2 विद्यार्थ्यांच्या संघाला एकूण 25,000 रुपये देण्यात आले. राज्य प्रथम उपविजेत्या शाळेला 1 लाख रुपये आणि विद्यार्थ्यांना एकूण 10,000 रुपयांचे पारितोषिक मिळाले. या पुरस्कांचे वितरण मुंबईत रविवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थित देण्यात आले.

अनुराग सिंह ठाकूर यांची प्रतिक्रिया : तसेच राज्य द्वितीय उपविजेत्या शाळेला 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सहभागी विद्यार्थ्यांना एकूण 5 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या 9 वर्षांपासून भारतात क्रीडा परिसंस्थेत अनेक पटींनी बदल झाला आहे. ऑलिम्पिक असो, पॅरालिम्पिक असो विक्रमी पदकांच्या ताऱ्यांमध्ये ते दिसून येत आहे. मला विश्वास आहे की, आम्ही या सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतही सर्वोच्च पदकतालिका मिळवणार आहोत, अनुराग सिंह ठाकूर यांनी नमूद केले.

फिट इंडिया क्विझचा उद्देश : शारीरिक तंदुरुस्तीच्या गरजेचा उल्लेख करताना अनुराग सिंग ठाकूर पुढे म्हणाले, भारतात लठ्ठपणा, हृदयविकाराच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. तरुणांमध्ये स्क्रीन टाइमही वाढत आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे त्यांना खेळाच्या मैदानावर नेणे आहे. आता फिटनेसचा संदेश देणे, शालेय विद्यार्थ्यांना भारताच्या क्रीडा इतिहासाची जाणीव करून देणे हा फिट इंडिया क्विझचा उद्देश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण डोळ्यांसमोर ठेवून, आम्ही शाळेतील मुख्य अभ्यासक्रमाचा भाग बनवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहोत.

एकूण 120 फेऱ्या : एकूण 348 शाळा आणि 418 विद्यार्थी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश फेरीसाठी निवडले गेले. या विद्यार्थ्यांमध्ये 39 टक्के विद्यार्थिनी होत्या. निवडलेल्या शाळांनी दोन विद्यार्थ्यांचा संघ तयार केला, ज्यांनी वेब फेरीच्या मालिकेद्वारे राज्य, केंद्रशासित प्रदेश स्पर्धेसाठी स्पर्धा केली. 36 राज्य, केंद्रशासित प्रदेश विजेते ओळखण्यासाठी एकूण 120 फेऱ्या घेण्यात आल्या. राज्य, केंद्रशासित प्रदेश चॅम्पियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 36 पैकी तब्बल 12 शाळा सरकारी शाळा आहेत.

हेही वाचा :

  1. Rinku Singh Story : क्रिकेटपटू रिंकू सिंहचे कुटुंब राहते एका खोलीत, मुलाच्या यशानंतर आई भावूक, म्हणाली...
  2. ICC World Cup 2023 : 'हे' चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, विश्वचषकावर वीरेंद्र सेहवागची भविष्यवाणी
  3. Legends Cricket Match : भारतात प्रथमच लिजेंड्स क्रिकेट लीगचे झारखंडमध्ये आयोजन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.