ETV Bharat / state

जो न्याय अर्णबला, तोच न्याय अनिल परबांना लावावा - अतुल भातखळकर

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करणाऱ्या ठाकरे सरकारने तोच न्याय मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणात लावावा. मनोज चौधरी यांच्या मृत्यूला कारणीभूत मानून परिवहनमंत्री अनिल परब यांना तत्काळ अटक करावी. भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी अशी मागणी केली आहे.

same-justice-for-arnab-now-the-same-justice-should-be-given-to-anil-parab-said-atul-bhatkhalkar
जो न्याय अर्णबला, तोच न्याय अनिल परबांना लावावा- अतुल भातखलकर
author img

By

Published : Nov 9, 2020, 5:06 PM IST

मुंबई - एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीला व कमी पगाराला कंटाळून एसटी महामंडळाचे कर्मचारी मनोज चौधरी यांनी आज दुर्दैवी आत्महत्या केली. आपल्या मृत्यूला ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. ही अत्यंत हृदयद्रावक घटना असून अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करणाऱ्या ठाकरे सरकारने तोच न्याय मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणात लावावा व मनोज चौधरी यांच्या मृत्यूला कारणीभूत मानून परिवहनमंत्री अनिल परब यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरत काम करणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मागील चार महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. एकीकडे मंत्र्यांच्या बंगल्यावर व गाड्यांवर करोडो रुपये खर्च करायचा, अनावश्यक विषयांत वकिलांना करोडो रुपये फी द्यायची, पण दुसरीकडे कोरोनाचे कारण पुढे करत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रोखून ठेवण्याचे पाप ठाकरे सरकार करत आहे. याविषयी वारंवार करण्यात आलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करून एसटी कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे महापाप ठाकरे सरकार करीत असल्याचा आरोपसुद्धा भातखळकर यांनी केला आहे.

हेही वाचा- 'भाजप सरकारने अनेक घरे उद्धवस्त केली' राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.