मुंबई - कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना विषाणूच्या विरोधात लढणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहे . अशाच प्रकारचे 50 लाख रुपयांचा विमा कवच महाराष्ट्रातील पोलिसांना द्यावे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे .
-
महाराष्ट्रामध्ये पोलीस दिवसरात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत, तरी माननीय पंतप्रधान @narendramodi यांना विनंती आहे की, ज्या प्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा संरक्षण दिले आहे त्याच प्रमाणे त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे. https://t.co/fkh36HkJPF
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महाराष्ट्रामध्ये पोलीस दिवसरात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत, तरी माननीय पंतप्रधान @narendramodi यांना विनंती आहे की, ज्या प्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा संरक्षण दिले आहे त्याच प्रमाणे त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे. https://t.co/fkh36HkJPF
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 30, 2020महाराष्ट्रामध्ये पोलीस दिवसरात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत, तरी माननीय पंतप्रधान @narendramodi यांना विनंती आहे की, ज्या प्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा संरक्षण दिले आहे त्याच प्रमाणे त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे. https://t.co/fkh36HkJPF
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 30, 2020
महाराष्ट्रात सध्या 215 कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा वाढत असून राज्य शासनाकडून राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. संचारबंदीमुळे राज्यातील प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूशी दोन हात करताना डॉक्टर, नर्स , कर्मचारी यांच्यासोबत पोलिसांनाही सध्याच्या परिस्थितीशी झगडावे लागत आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांशी पोलिसांचा थेट संपर्क येत असल्यामुळे पोलिसांनाही हा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनाही 50 लाख रुपयांचे विमा कवच मिळावे, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. या मागणीचा पाठपुरावा आपण करणार असल्याचेही त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले आहे.