ETV Bharat / state

भाजपचा सत्ता स्थापनेचा दावा मागे; शिवसेनेला दिल्या शुभेच्छा

महायुती म्हणून आम्हाला निवडणुकीत जनादेश मिळाला. मात्र, शिवसेना आमच्यासोबत सरकार स्थापन करू इच्छित नाही. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करून शकत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यापालांना सांगितले.

चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
author img

By

Published : Nov 10, 2019, 4:53 PM IST

Updated : Nov 10, 2019, 8:55 PM IST

मुंबई - महायुती म्हणून आम्हाला निवडणुकीत जनादेश मिळाला. मात्र, शिवसेना आमच्यासोबत सरकार स्थापन करू इच्छित नाही. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करून शकत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यापालांना सांगितले. यासंदर्भात राज्यापालांची आज भेट घेतल्याचेही पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

उद्धव म्हणाले, मुख्यमंत्री शिवसेनेचाच

मढ येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची शिवसेना आमदारांसोबतची बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदारांना मालाड येथील हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आले आहे. येथेच उद्धव ठाकरेंनी आमदारांसोबत बैठक घेतली. आदित्य ठाकरे कालपासूनच हॉटेल रिट्रीटमध्ये थांबले आहेत. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास उद्धव ठाकरे मातोश्रीवर परतले. राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केल्यानंतर शिवसेनेकडून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. आतापर्यंत आपण पालखीचे भोई होतो. आता यापुढे आपण पालखीचे भोई होणार नाहीत.

अल्पेश करकरे, प्रतिनिधी, मुंबई

संजय राऊत म्हणाले... उद्धव म्हणाले 'तेच' होणार

भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा मागे घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून भाजप म्हणत होते की मुख्यमंत्री आमचाचा होणार. पण भाजपकडून कोणतीही आश्वासक भूमिका घेण्यात आली नाही. उद्धव ठाकरे यांनी दुपारी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना मुख्यमंत्री आमचाच होणार असे सांगितले आहे.

  • लाईव्ह अपडेट्स -
  • शिवसेना सोबत नसल्याने भाजप सत्ता स्थापन करु शकत नाही - चंद्रकांत पाटील
  • भाजप कोअर कमिटीची बैठक संपली, नेते राजभवनात दाखल
    भाजपचे नेते राज्यपालांशी चर्चा करताना
    भाजपचे नेते राज्यपालांशी चर्चा करताना
  • भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना
    भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना
  • भाजप कोअर कमिटीची बैठक संपली
  • भाजप महाराष्ट्राचे प्रभारी भुपेंद्र यादव मुंबईत दाखल, कोअर कमिटीच्या बैठकीला राहणार उपस्थित
  • भाजप कोअर कमिटीची बैठक सुरु, बैठकीनंतर मुख्यमंत्री राजभवनावर जाण्याची शक्यता
  • भाजप नेते गिरीश महाजन, पंकजा मुंडे वर्षा बंगल्यावर
  • सत्ता स्थापनेबद्दल थोड्याच वेळात भाजप आपला अंतिम निर्णय जाहीर करणार

Intro:Body:

state news

Conclusion:
Last Updated : Nov 10, 2019, 8:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.