ETV Bharat / state

Air India Services : एअर इंडिया सोईस्कर विमान सेवेसह नेटवर्क आणखी बळकट करणार - AirAsia India

एअर इंडिया ही भारतातील आघाडीची विमानसेवा आहे. या विमानसेवा कंपनीने भुवनेश्वर (बीबीआय), बाडडोगरा (आयएसवी) आणि सुरत (एसटीव्ही) आता एअर इंडियाऐवजी एअर एशिया इंडिया म्हणून सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लांबपल्ल्याची आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणखी चांगली होणार आहे.

Air India will Further Strengthen The Network with Convenient Flight Services
एअर इंडिया सोईस्कर विमान सेवेसह नेटवर्क आणखी बळकट करणार
author img

By

Published : Feb 7, 2023, 4:26 PM IST

मुंबई : एअर इंडिया आता दिल्ली आणि चेन्नई, हैद्राबाद आणि बंगळुरू तसेच मुंबई ते चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू दरम्यानची विमानसेवा वाढवणार आहे. यामुळे एअर इंडियाचे नेटवर्क आणखी बळकट होणार आहे. सद्य:स्थितीमध्ये तीन स्टेशनस भुवनेश्वर (बीबीआय), बाडडोगरा (आयएसवी) आणि सुरत (एसटीव्ही) आता एअर इंडियाऐवजी एअर एशिया इंडिया म्हणून सेवा देणार आहे. दिल्ली-विशाखापट्टणम आणि मुंबई- लखनौ कामकाज एअर इंडियाद्वारे हाताळले जाणार आहेत.

एअर एशिया इंडिया म्हणून सेवा देणार : एअर इंडिया दिल्ली, मुंबई ते अहमदाबाद (एएमडी), कोचीन (सीओके), त्रिवेंद्रम (टीआरही), विशाखापट्टणम (कीटीझेड) आणि नागपूर (एनएजी) येथील सेवा वाढवली जाणार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी तसेच या दोन्ही महानगरांतून दिली जाणारी लांब पल्ल्याची आंतरराष्ट्रीय विमानसेवा चांगली होणार आहे. त्याशिवाय एयर इंडिया दिल्ली आणि चेन्नई, हैद्राबाद आणि बेंगळुरू तसेच मुंबई ते चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरूदरम्यानची विमानसेवा वाढवणार आहे.

आंतरराष्ट्रीय नेटवर्कही विस्तारता येईल : एअर एशिया इंडियाचे संपादन आणि एअर इंडियाची सध्या सुरू असलेली पुनर्बांधणी व विस्तार यांसह समूहाचे फ्लाइट नेटवर्क विस्तारण्याची चांगली संधी आम्हाला मिळाली आहे. विशेषतः यामुळे आम्हाला मार्गांची त्यांच्यासाठी जास्त सुसंगत असलेल्या एअरलाइन्स बिझनेस मॉडेलशी सांगड घालणे शक्य झाले आहे. लक्झरी प्रवासाचे जास्त प्रमाण असलेल्या बाजारपेठांमध्ये कमी किमतीची विमानसेवा देणे आता आम्हाला शक्य झाले आहे.

कॉर्पोरेट तसेच लीझर प्रवासी, या दोन्ही वर्गांना करणार आकर्षित : आम्हाला कॉर्पोरेट प्रवासी तसेच लीझर प्रवासी अशा दोन्ही वर्गांना आकर्षित करता येईल तसेच महत्त्वाच्या देशांतर्गत शहरांदरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढवता येईल आणि पर्यायाने एयर इंडियाचे वेगाने विकसित होत असलेले आंतरराष्ट्रीय नेटवर्कही विस्तारता येईल असे एयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन सांगितले.

एअर इंडियाबद्दल महत्त्वाची माहिती : जेआरडी टाटा यांनी यांनी एअर इंडियाच्या साहाय्याने भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात पदार्पण केले. 15 ऑक्टोबर 1932 रोजीच्या पहिल्या उड्डाणापासून, एअर इंडियाचे विस्तृत देशांतर्गत नेटवर्क आहे. यूएसए, कॅनडा, यूके, युरोप, सुदूर-पूर्व, दक्षिण-पूर्व आशियामध्ये नेटवर्क असलेली एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान कंपनी बनण्यासाठी तिचे पंख पसरले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि आखात देश सर्वात मोठे आहेत. एअर इंडिया स्टार अलायन्स या सर्वात मोठ्या जागतिक विमान कंपनीचा सदस्य आहे.

टाटा समूहात पुन्हा स्वागत : सरकारी मालकीचा उपक्रम म्हणून 69 वर्षांनंतर, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे जानेवारी 2022 मध्ये टाटा समूहात पुन्हा स्वागत करण्यात आले. एअर इंडियाचे सध्याचे व्यवस्थापन स्वतःची स्थापना करण्यासाठी Vihaan.Al च्या नेतृत्वाखाली पाच वर्षांच्या परिवर्तनाचा रोडमॅप करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.