मुंबई - चर्चगेट स्थानकाबाहेर सुशोभीकरणाच्या नावाखाली काही वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या सिमेंट शिटचा एक भाग पडला होता. त्यामध्ये मधुकर नार्वेकर (वय ६२) या वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर आता पश्चिम रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
स्थानकावरील पत्रा पडून मधुकर नार्वेकर या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर आज गुरुवारी चर्चगेट स्थानकाच्या बाहेरील भिंतीवर लावण्यात आलेले सिमेंट पत्रे काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जवळपास 3 वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे सुशोभीकरण करण्यात आले होते.
या दरम्यान चर्चगेट स्थानकाच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या सिमेंटच्या पत्र्यावर ब्राजीलच्या कलाकारांनी महात्मा गांधींचे चित्र रेखाटले होते. मधुकर नार्वेकर यांच्या नातेवाईकांना रेल्वेकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.