मुंबई Aditya Thackeray : मागील अनेक वर्षापासून मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple) न्यास समितीत ठाकरे गटाचंच वर्चस्व होतं. मात्र येथे देखील आता शिंदे गटाने शिरकाव केला आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी आता शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर आता ठाकरे गटातील युवा नेते आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल (Aditya Thackeray Attack On Sada Sarvankar) केला आहे. आदित्य ठाकरेंनी X वरुन पोस्ट करत शिंदे गट, भाजपा व सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. "दादरमध्ये यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपतीच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती", असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
'मिंधे-भाजपा गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व' : आदित्य ठाकरेंनी पुढे पोस्टमध्ये म्हटलंय की, ज्यांनी गणेशोत्वात हवेत गोळीबार केला. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजपा सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले. हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसेन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती. अटक व्हायला हवी होती. पण या कृत्याबद्दल त्यांना बक्षीसच मिळाल्याचं दिसतंय. मिंधे-भाजपा गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? आमच्या सणवाराला, गणपतीच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात?, खरंतर भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता. पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्र द्वेषाचं बक्षीस दिलं असेल. असं आदित्य ठाकरेंनी म्हणत शिंदे गट, भाजपा व सदा सरवणकर यांच्यावर टीका केली आहे.
कसा आहे सदा सरवणकरांचा राजकीय प्रवास? : सदा सरवणकर यांनी पहिल्यांदाच शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. यानंतर त्यांनी शिवसेनेत विभागप्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष अशी महत्त्वाची पदं भूषवली. यानंतर सदा सरवणकर 1992 ते 2007 पर्यंत नगरसेवक होते. 2004 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेतून आमदार झाले. 2009 मध्ये सरवणकरांनी तिकीट न दिल्यामुळं त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आदेश बांदेकरांना (Aadesh Bandekar) तिकिट देण्यात आले होते. त्यामुळं सरवणकर हे नाराज झाले होते, व त्यांनी काँग्रेसची वाट धरली. 2012 मध्ये सरवणकरांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. 2014 आणि 2019 मध्ये सरवणकर सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले. मात्र यानंतर शिंदे गटाने 2022 मध्ये बंड केल्यानंतर त्यांनी ठाकरे ऐवजी शिंदेकडे जाणे पसंत केलं.
हेही वाचा -
- Aaditya Thackeray : गद्दारांचा गट असतो, आमचा पक्ष आहे; दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येनं लोक येणार - आदित्य ठाकरे
- Nitesh Rane : दसरा झाल्यावर अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडून जाणार; नितेश राणेंचा मोठा गौप्यस्फोट
- Aaditya Thackeray : वाढत्या रुग्ण मृत्यू प्रकरणावर आम्हला राजकारण करायचं नाही, पण...- आदित्य ठाकरे