ETV Bharat / state

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानींच्या ताब्यात; अदानी समूहाकडे आता देशातील ७ विमानतळाची जबाबदारी - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा पूर्णपणे ताबा अदानी समूहाने घेतला आहे. गेल्या वर्षांपासून या विमानतळाच्या खरेदीसाठी प्रक्रिया सुरू झाली होती. आता अखेर अदानी समूहाने जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा घेतला आहे.

Adani Group Takes Over Management Control Of Mumbai International Airport
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानींच्या ताब्यात; अदानी समूहाकडे आता देशातील ७ विमानतळाची जबाबदारी
author img

By

Published : Jul 14, 2021, 1:57 AM IST

मुंबई - मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा पूर्णपणे ताबा अदानी समूहाने घेतला आहे. गेल्या वर्षांपासून या विमानतळाच्या खरेदीसाठी प्रक्रिया सुरू झाली होती. आता अखेर अदानी समूहाने जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे आता अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडकडे (एएएचएल) देशाचे सातवे विमानतळ आले आहे. त्यामुळे अदानी समूह देशातील सर्वात मोठा एअरपोर्ट ऑपरेटर बनला आहे.

जीव्हीकेकडून ओव्हरटेक-
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन जीव्हीके समूहाकडे होते. परंतु, जीव्हीके कंपनीवर आर्थिक अडचणीत सापडली होती. जवळजवळ जीव्हीके कंपनीवर अडीच हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर झाला होता. परिणामी जीव्हीके कंपनीला विमानतळ व्यवस्थापन विक्री काढल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षी अदानी समूहाने मुंबई विमानतळ खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तसा करारसुद्धा करण्यात आलेला होता. जीव्हीके आणि अदानीमधील कराराला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हिरवा कंदील दिला होता. इतर काही खात्यांकडून अद्याप यासाठी मंजुरी मिळणे बाकी होते. अखेर सर्व मान्यता मिळवून अदानी समूहाने जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा घेतला आहे.

मागील वर्षीपासून सुरू होती खरेदी प्रक्रिया -
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये अदानी समूहाने जीव्हीके ग्रुपसोबत करार केला होता. त्यानुसार जीव्हीकेच्या नावे असणारा ५०.५० टक्के वाटा अदानी समूहाच्या नावे करण्यात येण्याचे निश्चित झाले होते. त्याचप्रमाणे मुंबई विमानतळामध्ये १३.५० वाटा बिडवेस्ट कंपनी आणि १० टक्के वाटा हा एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ आफ्रिका या कंपनीचा होता. त्यामुळे या दोन्ही कंपनीशी अदानी समूहाने करार करून त्यांच्याकडील २३.५ टक्के वाटा आपल्या नावावर करण्याचाही करार केला होता. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडकडे मुंबई विमानतळ आले आहे.

गौतम अदानी केले ट्विट-
समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी, आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाची माहिती दिली आहे. गौतम अदानी यांनी आपल्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, विमानतळ पर्यावरणस्नेही करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. विमानतळ परिसरात संबंधित व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रयत्न करू. यामध्ये मनोरंजन, ई-कॉमर्स यासारख्या संकल्पनांचा समावेश आहे.

अदानींकडे एकूण किती विमानतळे?
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ताबा घेतल्यामुळे अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड आता देशातील सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा पुरविणारी कंपनी झाली आहे. आता अदानी समूहाकडे देशातील सात विमानतळाचा ताबा मिळालेल्या आहे. ज्यामध्ये लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे. या सात ही विमानतळांच्या विकास, व्यवस्थापन आणि परिचालनाची पुढील ५० वर्षांसाठी जबाबदारी असेल. विमानतळांच्या संख्येनुसार अदानी समूह देशातील सर्वात मोठा एअरपोर्ट ऑपरेटर ठरली आहे.

हेही वाचा - VIDEO: कारच्या बोनेटवर बसून गाठलं मंगल कार्यालय, लग्नाच्या दिवशीच नववधूवर गुन्हा दाख

हेही वाचा - चिकन, मासे, जिलेबी, पेढा काय पाहिजे ते सांगा! तुरुंगातील कैद्यांना आता सर्व काही मिळणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.