मुंबई: कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आता बॉलीवूड सुद्धा कोरोनाच्या जाळ्यात अडकत आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचालला कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली होती. जॉन आणि त्याची पत्नी प्रिया दोघेही घरामध्येच क्वारंटाइन झाले आहेत. जॉन हा काही दिवसांपूर्वी अशा एका व्यक्तीच्या संपर्कात आले होते ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जॉनने याबाबत सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. जॉनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये याची संपूर्ण माहिती दिली आहे. 'मी तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रिया आणि माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही दोघेही आता घरामध्येच क्वारंटाईन असून कोणाच्याही संपर्कात आलेलो नाहीत. याशिवाय आम्ही दोघांनीही लस घेतली असून, आम्हाला कोरोनाचे सौम्य लक्षणे दिसून आले आहेत.
John Abraham and Priya Positive : अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियाला कोरोनाची लागण - बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (Bollywood actor john Abraham) आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल (Priya Runchal) या दोघांनाही कोरोनाची लागण (Corona was infected) झाली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जॉनने तसा खुलासा केला आहे. दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली. जॉन आणि त्याची पत्नी प्रिया दोघेही घरामध्येच क्वारंटाइन (Quarantine at home) झाले आहेत.