ETV Bharat / state

Aap Entry In BMC election : दिल्लीच्या तख्तानंतर मुंबई महानगरपालिकेचा गढ जिंकण्यासाठी 'आप' पूर्ण तयारीत - मुंबई महानगरपालिकेचा गढ

मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ आली (Municipal Corporation Election Mumbai) आहे. या निवडणुकीत शिवसेना, भाजप व आम आदमी पक्ष असणार आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पावले उचलायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी केजरीवाल्यांचा आप पक्ष असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले (Aap Entry In BMC election) आहे.

Aap Entry In BMC election
बीएमसी निवडणुकीत आपची एन्ट्री
author img

By

Published : Dec 10, 2022, 8:49 AM IST

मुंबई : दिल्लीत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला चारी मुंड्या चित्त करून तेथील सत्ता काबीज केल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे लक्ष मिशन मुंबई आहे. विशेष म्हणजे गुजरात निवडणुकीतील निकालानंतर आता आप पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता भेटल्याने त्याचा कार्यकर्त्यांचा उत्साह जोमात आहे. अशात मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना या निवडणुकीत शिवसेना, भाजपसहित सर्व पक्षांना टक्कर देत इतिहास घडवण्याच्या तयारीत आम आदमी पक्ष आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पावले उचलायला सुरुवात केली (AAP ENTRY IN Municipal Corporation Election) आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणूक

'आप' ही मैदानात : मुंबई महापालिका निवडणुक तोंडावर आली असून सत्ताधारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आता कंबर कसली असताना दिल्लीच्या विजयानंतर आम आदमी पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून घोषणांचा सपाटाच लावण्यात आलाय. त्यात ५०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांची मालमत्ता करमाफी असेल किंवा महापालिकेच्या अर्थसंकल्पातील अनेक घोषणा. तर दुसरीकडे भाजप शिवसेनेला घेरण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. तर भाजपने मुंबई महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी एकूण २५ समित्यांची नियुक्ती केली आहे. आमदार आशिष शेलार यांच्यात नेतृत्वाखाली यंदाची महापालिका निवडणूक भाजप लढवत असून यासाठी मराठी कट्टा, जागर मुंबईचा असे उपक्रम राबवले जात आहेत. त्यातच या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी केजरीवाल्यांचा आप पक्ष असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले (BMC election) आहे.

काय म्हणाले शेलार ? याबाबत बोलताना भाजप नेते, मुंबई अध्यक्ष, आशिष शेलार म्हणाले की, प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जर लसावी व मसावी काढायचा असेल, तर मुंबई महानगरपालिकेबाबत राष्ट्रवादी कुठेही गिनतीमध्ये नाही आहे. काँग्रेस डाऊन टू साईज झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची अवस्था आता फार दुर्बल झाली असून आमचे लक्ष आता आम आदमी पक्षाच्या कार्यकर्ते व त्यांच्या कारवाईवर आहे. या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरा सामना हा भाजपविरुद्ध आम आदमी पक्ष यांच्यात होऊ (Municipal Corporation Election) शकतो.

पक्ष बांधणी पूर्ण : आशिष शेलार यांचे वक्तव्य व मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना आपचे प्रवक्ते धनंजय शिंदे म्हणाले की, दिल्लीमध्ये महापालिकेत पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपला आम्ही सत्तेवरून खाली खेचले. दिल्लीमध्ये कचऱ्याचे डोंगर होते, दिल्लीतील पालिका कर्मचाऱ्यांना पैसे नव्हते, हे सर्व मुद्दे बघून आम्ही ती निवडणूक लढवली व आम्ही जिंकलो. आता आमचे लक्ष मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील इतर २२ महानगर पालिका निवडणुकीवर आहे. आम आदमी पक्ष फक्त दिल्ली पुरताच मर्यादित आहे, असे छद्मीपणाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले आहेत. तर दुसरीकडे या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचा खरा प्रतिस्पर्धी हा आम आदमी पक्षच असणार आहे, असे मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी सांगितले आहे. जो आमच्या विरुद्ध आहे त्या सर्वांशी आमची लढाई असणार आहे. मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील २२ महानगरपालिका निवडणूक आम्ही लढवणार असून त्यासाठी ९५ टक्के पक्ष बांधणी पूर्ण झालेली (Municipal Corporation Election Mumbai) आहे.

जाहीरनामा घोषित करणार : बूथ व वॉर्ड पातळीवर तयारी सुरू झालेली आहे. विशेष करून महापालिकेमध्ये अडीच ते तीन वर्षांमध्ये काय काम झाले आहे. स्थानिक मुद्दे काय आहेत? या विषयांवर निवडणूक लढवणार आहोत. पाणी प्रश्न, घरपट्टीबाबत सवलत हे सर्व मुद्दे व त्यासोबत त्या महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आधारे आम्ही निवडणुकीचा जाहीरनामा घोषित करणार असल्याचंही धनंजय शिंदे यांनी सांगितले आहे. इतकी वर्ष भाजप, शिवसेनेबरोबर पालिकेत सत्तेत होता व हा भाजप पक्ष आता आप पक्षाबद्दल वल्गना करत आहे, त्या पक्षाला धूळ चारल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही धनंजय शिंदे यांनी सांगितले (Aap Entry In BMC election) आहे.

मागील सत्ता समीकरण : २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत, शिवसेना ९३ जागा, भाजप ८३ जागा, काँग्रेस ३१जागा, राष्ट्रवादी काँग्रेस ९ जागा, सपा ६ जागा, एआयएमआयएम २ जागा, मनसे १ जागा, तर अपक्ष ६ जागा, असे समीकरण होते. खरे तर भाजपने गेल्या निवडणुकीत ८२ जागा जिंकत शिवसेनेला धक्का दिला होता. यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत आपली सत्ता राखण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर असले तरी कुठल्याही परिस्थितीत महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजप व त्यांच्या मित्र पक्षांनी कंबर कसली असताना आपची जादूची कांडी काय उलथापालथ करेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.