मुंबई : पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या किती यावर त्या देशाचे, राज्याचे, जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण मोजले जाते. महाराष्ट्रात २०२१ मध्ये हजार पुरुषांच्या तुलनेत ९०६ महिला आहेत. बुलढाणा जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाण सर्वात कमी आहे. बुलढाण्यात हजार मुलांच्या मागे केवळ ८६५ मुली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९५१ असून हे राज्यात सर्वाधिक आहे. वर्धा आणि गडचिरोलीमध्ये ३२ ने, चंद्रपुरमध्ये २५, यवतमाळमध्ये २३ ने वाढ झाली आहे.
या जिल्ह्यात महिलांच्या संख्येत घट: २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये बीडचे गुणोत्तर प्रमाण ८७ ने घटले आहे. २०२० च्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये महाराष्ट्रतात गुणोत्तर प्रमाणात ७ ने कमी झाले आहे. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये दर हजारी मुलींच्या प्रमाणात वाशीममध्ये १०१, रत्नागिरीमध्ये ४८, सातारामध्ये ३६, औरंगाबादमध्ये ३६, नंदुरबारमध्ये २६ ने घट झाली आहे.
सरकार, समाजाने विचार करावा : माता जिजाऊ, सावित्री बाई फुले यांचा महाराष्ट्र असे आपण सातत्याने बोलत असतो. याच पुरोगामी महाराष्ट्रात मुलींचे प्रमाण सातत्याने घटत आहे. २०११ - १२ मध्ये मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९२९ इतके होते. ते २०२० - २१ मध्ये ९०६ इतके झाले आहे. काही जिल्ह्यात हे प्रमाण फारच कमी झाले आहे. उत्तरे कडील राज्यापेक्षा हे प्रमाण कमी आहे. याची आपण दखल घेतली नाही तर, सर्वात कमी मुलीची संख्या असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद होईल. ही दुःखद अशी घटना असून सरकार आणि समाजाने याचा विचार करावा असे, आवाहन समर्थन अर्थसंकल्प अध्ययन केंद्राचे विश्लेषक रुपेश किर यांनी केले आहे.
पुरोगामी महाराष्ट्र २७ व्या स्थानावर: राज्याची लोकसंख्या १२ कोटी ४९ लाख इतकी असून ६ वयाखालील लिंग गुणोत्तर प्रमाणात पुरोगामी महाराष्ट्र देशात २७ व्या स्थानावर आहे. राज्यात स्त्रीभ्रूण हत्येच्या ६१२ केसेस नोंद झाल्या आहेत. महाराष्ट्र गेल्या सात वर्षात राज्य सरकारकडून आरोग्य विभागावर वर्षाला सरासरी ९ हजार ३४७ कोटी रुपये म्हणजेच सखल उत्पन्नाच्या ०.३८ टक्के इतका केला जातो.