मुंबई- शहरातील वरळी कोळीवाडा आणि धारावीनंतर आता सायन कोळीवाड्यातील पंजाबी कॅम्पमधील एका चाळीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळला आहे. ही व्यक्ती राहत असलेल्या चाळीला पालिका आणि पोलिसांनी बंद केले असून पुढील आदेश मिळेपर्यंत इमारतीमधील रहिवाशांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सायन कोळीवाडा पंजाबी कॅम्प हा भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाला त्यावेळी बॉर्डरवर असलेल्या लोकांचा भाग म्हणून ओळखला जातो. दरम्यान, चाळीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अन्न, धान्य तसेच लागणारे इतर साहित्य घरपोच दिले जाणार आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत आणि इतर रुग्णांच्या चाचण्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत नागरिकांनी चाळीबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.