ETV Bharat / state

शहीद हेमंत करकरेंच्या कन्येने पुस्तकातून उलगडले बहुआयामी व्यक्तीमत्व - Jui Karkare

२६/११ हल्ल्याला ११ वर्षे पूर्ण होत असताना जुई करकरे यांनी दहशतवाद्यांविरोधात लढलेल्या वडिलांच्या आठवणींचे स्मरण केले. आयटी अभियंता असलेल्या जुई म्हणाल्या, ते पुस्तक प्रेमी आणि चांगले व्यक्तिमत्व होते.

Jui Karkare
जुई करकरे
author img

By

Published : Nov 26, 2019, 6:54 AM IST

मुंबई - शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे हे केवळ धाडसी पोलीस अधिकारी नव्हते. तर सामाजिक कार्यकर्ते व कुटुंबावर प्रेम करणारे व्यक्तीदेखील होते. त्यांनी स्वत:ला कष्टाला घडविले होते, असे त्यांच्या कन्या जुई करकरे यांनी म्हटले. त्या वडिलांवर लिहिलेल्या 'हेमंत करकरे ए डॉटर्स मोमोईर' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होत्या.

२६/११ च्या हल्ल्याला ११ वर्षे पूर्ण होत असताना जुई करकरे यांनी दहशतवाद्यांविरोधात लढलेल्या वडिलांच्या आठवणींचे स्मरण केले. आयटी अभियंता असलेल्या जुई म्हणाल्या, वडील हे पुस्तक प्रेमी आणि चांगले व्यक्तिमत्व होते.

मुलगी म्हणून मला वडिलांचे आयुष्य खूप प्रेरणादायी होते. त्यांना स्वत:ला साधारण मुलापासून विलक्षण व्यक्तीमत्वात घडविले होते. ही गोष्ट इतरांनाही सांगणे हे माझे कर्तव्य असल्याचे वाटते. त्यांनी आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका पार पडल्या होत्या. ते आदर्शवत पोलीस अधिकारी होते. तसेच त्यांनी दूत म्हणून विविध जागतिक मंचावर देशाचे प्रतिनिधीत्व केले. तसेच ते कलाकारही होते. त्यांचे आयुष्य म्हणजे प्रेरणास्त्रोत आहे. त्यांना जिद्दीने निर्धार करण्यासाठी अनेक वर्षे लागली. तसेच अनेक गुण आत्मसात करण्याठी खूप मेहनत करावी लागली. त्यांच्या आयुष्यापासून शिकत १० टक्के गुण घेतले तरी आपण खूप चांगल्या ठिकाणी असू, असे त्यांनी मत व्यक्त केले. हेमंत करकरे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात त्यांचे सहकारी, नातलग, मित्र आदींनी सांगितलेले प्रसंग व अनुभव आहेत.

जुई करकरे पुस्तकाविषयी माहिती देताना

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विदेशातील नागरिकांसह १६६ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ३०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.