मुंबई - राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अनेक फेरबदल करत आहे. याचाच भाग म्हणून मंत्रालयासह राज्यातील २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांची बदली समाज कल्याण आयुक्त पुणे येथे करण्यात आली. विक्रीकर विभागाचे प्रधान सचिव राजीव जलोटा यांची ग्रामविकास खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर के. एच. गोविंदराज यांची महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन(एमएमआरडीए)च्या आयुक्तपदी तर बी. वेणूगोपाल यांची वनविभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची कधीही भेट झाली नाही - बलजीत परमार
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जे. मुखर्जी यांची नियुक्ती अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी केली आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक पदी मागील चार वर्ष एका आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. आता मात्र, त्या जागी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी डी. डी. पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि विभाग -
1) जे मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ यांची अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती.
2) एस. ए. तागडे, अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव, यांची बदली वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिवपदी.
3) डॉ. के. एच. गोविंदराज, प्रधान सचिव वस्त्रोद्योग यांची बदली अतिरिक्त महानगर आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागात करण्यात आली.
4) बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची बदली वनविभागाच्या प्रधान सचिवपदी झाली.
5) राजीव जलोटा, आयुक्त विक्रीकर विभाग यांची बदली ग्रामविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी करण्यात आली.
6) संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची विक्रीकर विभाग महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या आयुक्तपदी बदली केली.
7) असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव ग्रामविकास यांची बदली ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवपदी झाली.
8) प्रवीण दराडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, मुंबई यांची समाज कल्याण विभाग, पुणेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
9) शैला ए. विक्रीकर आयुक्त यांची बदली महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली.
10) पी. वेलरासू, सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली.
11) श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सातारा यांची पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी बदली.
12) दीपक सिंगला, आयुक्त मृद व जलसंधारण, औरंगाबाद यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली.
13) डी. डी. पांढरपट्टे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची बदली मुंबईच्या माहिती व जनसंपर्क महासंचालकपदी करण्यात आली.
14) शेखर सिंग, जिल्हाधिकारी गडचिरोली यांची साताऱयाच्या जिल्हाधिकारी पदी बदली.
15) मंजू लक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली.
16) मिलिंद शंभरकर, आयुक्त समाज कल्याण विभाग यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी बदली.
17) आर. बी. भोसले, जिल्हाधिकारी सोलापूर यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याणच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती.
18) नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे बदली.
19) डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, जिल्हाधिकारी रायगड यांची महानगर परिवहन महामंडळ पुणेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती.
20) आर. एस. जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त नागपूर येथे झाली.
21) भुवनेश्वरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांची बदली भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती.
22) मदन नागरगोजे यांची माहिती व तंत्रज्ञान, मुंबईच्या संचालकपदी बदली करण्यात आली.