मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. तब्बल ९६ हजार २६० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, तर यापैकी २ हजार ७४७ मतदान केंद्र ही संवेदनशील आहेत. यामध्ये सर्वाधीक ठाणे जिल्ह्यात असून यात शहरी भागात ४११ आणि ग्रामीण भागात १८८ मतदान केंद्र आहेत. तर सर्वात कमी बुलडाणा जिल्ह्यात असून त्याची संख्या १ आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
विधानसभेत ईव्हीएम हॅक होणार नाही, त्यामुळे सत्ता आमचीच - प्रकाश आंबेडकर
मुंबईत ३२५, पुणे शहरात ११२, पुणे ग्रामीणमध्ये १००, त्यानंतर अमरावती शहरात १७७, तर ग्रामीणमध्ये ४०, नाशिक शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी ४८, धुळे-४४, जळगाव-३६, नंदुरबार-३, अकोला-१२, वाशिम-८५, हिंगोली-११, परभणी-५१, लातूर-५२, उस्मानाबाद-२३, सोलापूर शहर - ३९ आणि ग्रामीण-९९, सांगली-२९, नागपूर शहर आणि ग्रामीण प्रत्येकी ३०, भंडारा- ४५, गोंदिया- १२६, चंद्रपूर- ३९, पालघर-१४, औरंगाबाद शहर- ५७ आणि ग्रामीण-३५ अशी मतदान केंद्र आहेत. राज्यात तीन ठिकाणी असुरक्षित मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे.
विधानसभा निवडणूक: नागपूरमध्ये भाजपच्या गडाला काँग्रेस देणार का हादरा?
विधानसभा निवडणुकीसाठी १ लाख ७२ हजार ९३५ पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. या निवडणुकीदरम्यान राज्याच्या सर्व सीमेवर तब्बल १६६ चेक पोस्ट ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये गुजरातच्या सीमेवर-३१, मध्यप्रदेश-४९, तेलंगणा-२३, कर्नाटक-४७ आणि गोवाच्या सीमेवर ८ असे एकूण १६६ चेकपोस्ट असणार आहेत.