ETV Bharat / state

राज्यात कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा अडीच हजारांवर, 27 जणांचा मृत्यू

राज्यातील पोलीस खात्यात चिंतेचे वातावरण परसले आहे. याचे कारण म्हणजे मागील 24 तासांत राज्यात 93 पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. राज्यातील एकुण कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा 2 हजार 509वर पोहोचला आहे.

file photo
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jun 1, 2020, 2:17 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीचे पालन व्हावे, यासाठी राज्यातील पोलीस यंत्रणा झटत आहे. मात्र, पोलीस खात्याच्या चिंतेत सध्या भर पडली आहे. राज्यात मागील 24 तासांत 93 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून एकुण बाधित पोलिसांचा आकडा 2 हजार 509 वर पोहोचला आहे.

यापैकी अजूनही 1 हजार 514 पोलिसांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असून यात 191 पोलीस अधिकारी व 1 हजार 323 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 27 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टाळेबंदीच्या काळात राज्यात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 21 हजार 075 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. क्वारंटाइनचे नियम तोडणाऱ्या 706 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 257 घटना घडल्या असून यात 26 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 835 जणांना अटक केली आहे.

कोरोना संदर्भात पोलिसांच्या 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर तब्बल 98 हजार 672 फोन आले आहेत. टाळेबंदी दरम्यान अवैध वाहतुक करणाऱ्या 1 हजार 323 प्रकरणात 76 हजार 883 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या संदर्भात आतापर्यंत 23 हजार 641 जणांना अटक करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व मेडिकल स्टाफवर राज्यात विविध 45 ठिकाणी हल्ले झाले आहेत, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा - अरबी समुद्रात चक्रीवादळ; महाराष्ट्र-गुजरात सीमेवर ३ जूनला धडकणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.