मुंबई - जगभरात पसरलेला कोरोना विषाणू सुरक्षित अंतर ठेवल्याने पसरत नाही असे सांगण्यात येते. मात्र आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीत असलेल्या धारावीत मुंबईतील धारावी परिसरात कोरोनाचे आणखी दोन नवे रुग्ण आढळले धारावीतील रुग्णांची एकुण 7 झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यूही झाला आहे. धारावी आणि इतर झोपडपट्टीत लोक दाटीवाटीने रहात असल्याने कोरोनाचा प्रसार जलदगतीने होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धारावी येथीलर बलिगा नगरमध्ये एका व्यक्तीकडे दिल्लीहून 5 ते 6 लोक राहण्यास आले होते. त्यांचा 4 ते 5 दिवस पाहुणचार केल्यावर ते धारावी विभागातून निघून गेले. मात्र, जाताना या व्यक्तीला कोरोनाची लागण देऊन गेले. या व्यक्तीला सायन रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. याच इमारतीमध्ये राहणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली.
धारावीमध्ये राहणाऱ्या आणि वॉकहार्ट रुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. धारावीत सफाईचे काम करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता बलिगा नगरमध्ये आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. बलिगा नगरमध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिलेचे वडील आणि भाऊ यांना कोरोनाची लागण झाली आहे.
धारावी सारख्या झोपडपट्टीत लाखो लोक दाटीवाटीने राहतात. एकाच घरात राहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. धारावी सारख्या झोपडपट्टीत लाखो लोक राहतात. यामुळे पालिकेचे आरोग्य विभाग काळजी घेत आहे. मात्र, धारावी सारख्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झाल्यास मुंबईत हाहाकार उडू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. धारावी आणि दादर शिवाजी पार्क हे विभाग येत असलेक्या पालिकेच्या जी नॉर्थ विभागात 9 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकट्या धारावीत 7 रुग्ण आहेत.
हेही वाचा - वॉकहार्ट रुग्णालयातील 40 नर्सना कोरोनाची लागण, जसलोकमधील कर्मचारीही क्वारंटाईन