ETV Bharat / state

चिंताजनक : राज्यात कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 1666वर

राज्यात 1666 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात तब्बल 183 पोलीस अधिकारी असून 1483 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील 16 पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

चिंताजनक : राज्यात कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 1666 वर

author img

By

Published : May 22, 2020, 3:54 PM IST

मुंबई - लॉकडाऊनची रस्त्यावर 24 तास उभे राहून अंमलबजावणी करणारे पोलीस हे कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण आटोक्यात आल्याचे दिसत नाही. राज्यात 1666 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात तब्बल 183 पोलीस अधिकारी असून 1483 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील 16 पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 473 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 35 पोलीस अधिकारी व 438 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अजूनही 1177 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 147 पोलीस अधिकारी व 1030 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, तर मुंबई पोलीस खात्यातील 191 पोलीस कर्मचारी हे कोरोनातून बरे होऊन पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले आहेत.

लॉकडाऊन काळात राज्यात कलम 188नुसार तब्बल 1 लाख 12 हजार 008 गुन्हे नोंदविण्यात आले असून 680 जणांवर क्वारंटाईन मोडल्याच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 247 घटना घडल्या असून यात आतापर्यंत पोलिसांनी 823 जणांना अटक केली आहे. कोरोनासंदर्भात पोलिसांच्या 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर तब्बल 95291 कॉल आले असून अवैध वाहतुकीच्या 1317 प्रकरणात 69043 वाहन जप्त करण्यात आली आहेत. कोव्हिड-19 वर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स व मेडिकल स्टाफवर 41 ठिकाणी हल्ले झाले असून तब्बल 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.