ETV Bharat / state

लातूर जिल्ह्यात 271 कोरोनाबाधित रुग्ण वाढले; 12 जणांचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात मंगळवारी 271 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येने 4 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात 12 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 156 झाली.

latur corona update
लातूर कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 12, 2020, 1:38 AM IST

लातूर- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी सर्वाधिक रुग्णांची भर पडली असून दिवसभरात 271 कोरोना रुग्ण वाढले. 12 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 156 वर पोहोचली आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव संपूर्ण जिल्ह्यात झाला आहे. गेले काही दिवस 200 रुग्णांची वाढ होत होती. मंगळवारी सर्वाधिक 271 रुग्ण वाढले आहेत. लातूर शहरात लॉकडाऊन असतानाही रुग्णांची वाढती संख्या वाढत चिंतेची बाब आहे. तर दुसरीकडे 16 ऑगस्टपासून लॉकडाऊन उठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी 1 लाख जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे रॅपिड अँटिजेन टेस्ट वाढवण्यात आल्या आहेत. मंगळवारी 271 पॉझिटिव्ह अहवालांपैकी 18 अहवाल हे आर.टी.पी.एस.च्या माध्यमातून तर उर्वरित 253 पॉझिटिव्ह अहवाल हे रॅपिड टेस्टमधून समोर आले आहेत. शिवाय रॅपिड टेस्ट वाढविण्यात येणार असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लातूर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 4101 वर पोहोचली आहे. यापैकी 2233 जण कोरोनामुक्त घरी परतले तर 1712 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 156 जणांना जीव गमवावा लागला आहे. रॅपिड टेस्टमुळे प्राथमिक अवस्थेतच रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मृत्युदर देखील कमी होत असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, कोरोनाची साखळी तोडणेही तेवढेच महत्वाचे आहे.

दरम्यान, राज्यात मंगळवारी 11088 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 535601 अशी झाली आहे. दिवसभरात 10014 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण 368435 जण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. राज्यात एकूण 148553 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.