लातूर - लोकसभा निवडणुकीसाठी १२ जणांनी २७ अर्ज दाखल केले होते. आज (शुक्रवारी) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी यातील दोघांनी माघार घेतली. त्यामुळे आता १० उमेदवारांमध्ये ही निवडणूक होणार आहे. मिलिंद महालिंगे आणि मिलिंद कांबळे, अशी माघार घेणाऱ्यांची नावे आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १५ जणांनी २७ अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज छाननीमध्ये तिघांचे अर्ज बाद झाले. त्यानंतर आज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या समक्ष मिलिंद महालिंगे आणि मिलिंद कांबळेंनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १० जणांमध्ये ही निवडणूक होणार आहे.
रमेश निवृत्ती कांबळे (अपक्ष), सुधाकर तुकाराम श्रृंगारे (भाजप), सिद्धर्थकुमार दिगंबर सुर्यवंशी (बसप), अरुण रामराव सोनटक्के (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), दत्तु प्रभाकर करंजीकर (बहुजन मुक्ती पार्टी), रामराव नरसिंग गारकर (वंचित बहुजन आघाडी), मधुकर संभाजी कांबळे (अपक्ष), मच्छिंद्र गुणवंतराव कामंत (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष), पपिता रावसाहेब रणदिवे (अपक्ष), रुपेश शामराव शंके (स्वतंत्र भारत पक्ष) हे उमेदवार लोकसभा निवडणुकांमध्ये नशीब आजमावणार आहेत.