ETV Bharat / state

लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची नामुष्की?

author img

By

Published : Aug 1, 2019, 10:38 AM IST

Updated : Aug 1, 2019, 7:38 PM IST

उर्वरित काळात पाऊस झाला तर ठीक अन्यथा, पुन्हा रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाला ठेवावी लागणार आहे. सध्या त्याअनुशंगाने बैठकावर-बैठका पार पडत असून सध्याचे पाणी आणि भविष्यात निर्माण होणारी स्थितीचा आढावा घेतला जात आहे.

लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ?

लातूर - पावसाने दिलेली उघडीप आणि मांजरा धरणातील घटती पाणी पातळी यामुळे जिल्ह्यावर पुन्हा पाणीसंकट ओढावले आहे. हीच परिस्थिती राहिली तर सप्टेंबरपर्यंतच मांजरा धरणातून पाणीपुरवठा शक्य आहे. त्यानंतर मात्र, पुन्हा मिरजहून रेल्वेनेच पाणीपुरवठा करावा लागेल. उपाययोजना म्हणून तशा हलचालीही सुरू झाल्या आहे. मात्र, जिल्हा प्रशासन अद्यापही पावसाबाबत आशादायी आहे.

पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यात केवळ १६७ मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत केवळ २३ टक्के पाऊस झाला असल्याने लहान-मोठे प्रकल्प हे कोरडेठाक आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यातही जिल्ह्यात १०८ टँकरने पाणीपुरवठा होत आहे तर चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. लातूर शहराला सध्या १२ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात असून मांजरा धरण हाच एकमेव स्त्रोत आहे. गेल्या ८ महिन्यांपासून हे धरणही मृतसाठ्यात आहे. त्यामुळे या धरणात राहिलेले ७ दश लक्ष घनमीटर पाणी सप्टेंबर महिन्यापर्यंतच पुरेल, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे.

उर्वरित काळात पाऊस झाला तर ठीक अन्यथा पुन्हा रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाला ठेवावी लागणार आहे. सध्या त्याअनुशंगाने बैठकावर बैठका पार पडत असून सध्याचे पाणी आणि भविष्यात निर्माण होणारी स्थिती याचा आढावा घेतला जात आहे. २०१५ - १६ मध्ये राबवण्यात आलेला आराखडाही तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. यापूर्वी २०१६ साली मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. येथूनच रेल्वेच्या ५० वाघिणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे तेथील पाईपलाईन तयार असून येणारा खर्च ही कमी होणार नाही. आवश्यकता निर्माण झाली तर पुन्हा रेल्वेने पाणीपुरवठा होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Intro:...तर लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ?
लातूर - पावसाने दिलेली उघडीप आणि मांजरा धरणातील घटती पाणी पातळी यामुळे जिल्ह्यावर पुन्हा पाणीसंकट ओढावले आहे. हीच परस्थिती राहिली तर संप्टेंबरपर्यंतच मांजरा धरणातून पाणीपुरवठा शक्य आहे. त्यानंतर मात्र, पुन्हा मिरजहून रेल्वेनेच पाणीपुरवठा करावा लागेल. उपाययोजना म्हणून तशा हलचालीही सुरू झाल्या आहे. मात्र, जिल्हा प्रशासन अद्यापही पावसाबाबात आशादायी आहे.
Body:पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यात केवळ १६७ मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत केवळ २३ टक्के पाऊस झाला असल्याने लहान-मोठे प्रकल्प हे कोरडेठाक आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यातही जिल्ह्यात १०८ टँकरने पाणीपुरवठा होत आहे तर चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेततकऱ्यांकडून केली जात आहे. लातूर शहराला सध्या १२ दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात असून मांजरा धरण हाच एकमेव स्त्रोत आहे. गेल्या ८ महिन्यापासून हे धरणही मृतसाठ्यात आहे. त्यामुळे या धरणात राहिलेले ७ दलघमी पाणी हे सप्टेंबर महिन्यापर्यंतच पुरेल असा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तिवला आहे. उर्वरीत काळात पाऊस झाला तर ठिक अन्यथा पुन्हा रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाला ठेवावी लागणार आहे. सध्या त्याअनुशंगाने बैठकावर बैठका पार पडत असून सध्याचे पाणी आणि भविष्यात निर्माण होणारी स्थिती याचा आढावा घेतला जात आहे. सन २०१५ - १६ मध्ये राबविण्यात आलेला आराखडाही तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. यापुर्वी २०१६ साली मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. येथूनच रेल्वेच्या ५० वाघिणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे तेथील पाईपलाईन तयार असून येणारा खर्चही कमी होणार नाही. Conclusion:आवश्यकता निर्माण झाली तर पुन्हा रेल्वेने पाणीपुरवठा होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Last Updated : Aug 1, 2019, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.