ETV Bharat / state

आता लढा राज्याच्या राजधानीत; मराठवाडास्तरीय बैठकीत कोळी समाजाचा निर्धार - बैठक

महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने आता राज्याच्या राजधानीत प्रमाणपत्रासाठीचा लढा देण्याचा निर्धार या समाजबांधवानी केला आहे

कोळी
author img

By

Published : Jul 24, 2019, 9:19 AM IST

लातूर- आजही महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याकडे प्रशासनाचे आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने आता राज्याच्या राजधानीत प्रमाणपत्रासाठीचा लढा देण्याचा निर्धार या समाज बांधवानी केला आहे. ४ ऑगस्टपासून आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय लातूर येथे पार पडलेल्या मराठवाडास्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे.

आदिवासी कोळी क्रांती सेनेच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. जात प्रमाणपत्र काढताना आणि जात वैधता प्रमाणपत्र काढताना होत असलेल्या त्रासवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. समाजातील अनेक तरुणांना नौकरीच्या संधी असतानाही न्याय मिळत नाही. समाजात असलेल्या आर्थिक दुर्बलतेमुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधींना मुकावे लागत आहे. मागील अनेक वर्षापासून जातप्रमाणपत्राबाबत राज्य स्तरावर लढा देण्यात आलेला आहे. मात्र सरकारकडून अद्यापपर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आंदोलनाची पहिली पायरी ही मुंबईला आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनच्या स्वरूपात करण्यात येणार आहे.

जोपर्यंत योग्य तो निर्णय सरकार घेत नाही तोपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने मराठवाडा स्तरावरील पहिली बैठक लातूरमध्ये पार पडली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आता न्याय मिळेपर्यंत लढा देण्यावर बैठकीत एकवाक्यात झाली.

या बैठकीला लातूर जिल्ह्यातून सतीश धडे, चंद्रहास नलमले, माधव पिटले, गोविंद सोदले, संजय नाटकरे, शिवशंकर फुले, पंढरीनाथ कोणे, अनिल अधटराव, संजय येलममवाड, गजानन मनतलंवाड, माधव पुनवाड यासह बीड, हिंगोली, औरंगाबाद, जालना येथील महादेव कोळी समाज बांधवांची उपस्थिती होती.

Intro:आता लढा राज्याच्या राजधानीत ; मराठवाडास्तरीय बैठकीत कोळी समाजाचा निर्धार
लातूर : आजही महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून याकडे प्रशासनाचे आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने आता राज्याच्या राजधानीत प्रमाणपत्रासाठीचा लढा देण्याचा निर्धार या समाज बांधवानी केला आहे. ४ ऑगस्टपासून आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय लातूर येथे पार पडलेल्या मराठवाडास्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे.
Body:आदिवासी कोळी क्रांती सेनेच्या वतीने हि बैठक आयोजित करण्यात आली होती. जात प्रमाणपत्र काढताना आणि जात वैधता प्रमाणपत्र काढताना होत असलेल्या त्रास वर चर्चा करण्यात आली. एकमेव कारणामुळे समाजातील अनेक तरुणांना नौकरीच्या संधी असताना हि न्याय मिळत नाही. समाजात असलेल्या आर्थिक दुर्बलतेमुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधीना मुकावे लागत आहे. मागील अनेक वर्षापासून जातप्रमाणपत्र बाबत राज्य स्तरावर लढा देण्यात आलेला आहे. मात्र सरकारकडून अद्याप पर्यंत कोणतेही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आंदोलनाची पहिली पायरी हि मुंबईला आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनच्या स्वरूपात करण्यात येणार आहे. जोपर्यंत योग्य तो निर्णय सरकार घेत नाही तोपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने मराठवाडा स्तरावरील पहिली बैठक लातूरमध्ये पार पडली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आता न्याय मिळेपर्यंत लढा देण्यावर बैठकीत एकवाक्यात झाली. Conclusion:या बैठकीला लातूर जिल्ह्यातून सतीश धडे, चंद्रहास नलमले, माधव पिटले, गोविंद सोदले, संजय नाटकरे, शिवशंकर फुले, पंढरीनाथ कोणे, अनिल अधटराव, संजय येलममवाड, गजानन मनतलंवाड, माधव पुनवाड यासह बीड, हिंगोली, औरंगाबाद, जालना येथील महादेव कोळी समाज बांधवांची उपस्थिती होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.