लातूर - जिल्ह्यात नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील शेतकऱ्याने कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे गळफास घेत आत्महत्या केली आहे.
हणमंत संतराम मेकले (43) असे आत्महत्या करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर बँकेचे 10 लाखाचे कर्ज होते. नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे कर्ज फेडू शकत नसल्याबाबतची चिठ्ठी त्यांच्या खिशामध्ये सापडली आहे. घरचा कर्ता पुरुषच गेल्याने मेकले कुटुंबीयांच्या अडचणीत भर पडली आहे.
जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर, गेल्या 2 वर्षापासूनच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे.