ETV Bharat / state

पावसाची अवकृपा : लातुरात सोयाबीन चिखलात अन् शेतकरी संकटात

लातूरमध्ये सोयाबीन हेच खरिपातील प्रमुख पीक आहे. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने संपूर्ण हंगामचे धोक्यात होता. शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर पिकांची जोपासना केली. मात्र, ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पीके शेतातच पडलेले आहे.

लातुरात सोयाबीन चिखलात अन् शेतकरी संकटात
author img

By

Published : Nov 2, 2019, 1:07 PM IST

लातूर - जिल्ह्यात गेल्या ८ दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काढणी झालेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता जगावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

लातुरात सोयाबीन चिखलात अन् शेतकरी संकटात

लातूरमध्ये सोयाबीन हेच खरिपातील प्रमुख पीक आहे. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने संपूर्ण हंगामचे धोक्यात होता. शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर पिकांची जोपासना केली. मात्र, ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पीके शेतातच पडलेले आहे. काही गुडघाभर पाणी आहे. त्यामुळे खरिपाचा हंगाम हातातून गेलेला आहे.

गातेगाव येथील सुरेखा राजाभाऊ डोने यांनी ४ बॅगच्या सोयाबीनची पेरणी केली होती. त्यांनी तळ हाताप्रमाणे त्या पिकांची जोपासना केली. मात्र, निसर्गाची अवकृपा झाली आणि संपूर्ण पीक पाण्याखाली गेल्याचे सुरेखा यांनी सांगितले.

नुकसानीचे पंचनामे तसेच कुठलीही औपचारिकता न करत सरसकट प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. पावसाने लवकर उघडीप न दिल्यास खरिपापाठोपाठ रब्बीवर हंगामासाठी देखील धोक्याची घंटा मानली जात आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने रब्बीला उशिराने सुरुवात होणार आहे. सध्याची अवस्था पाहता शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे.

Intro:परतीची अवकृपा : सोयाबीन चिखलात अन पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात
लातूर : संबंध पावसाळ्यात पाठ फिरवलेल्या वरूनराजाने परतीच्या प्रसंगी असा काय धुमाकूळ घातला आहे की, हाताशी आलेले पीकही पदरात पाडून घेणे मुश्किल झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतातील सोयाबीन पिक चिखलात तर ते पाहून पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अशीच काहीशी अवस्था लातूर तालुक्यातील गातेगाव गावच्या शेतकऱ्यांची झाली आहे. येथील सुरेखा राजाभाऊ डोने यांनी 4 बॅगच्या सोयाबीनचा पेरा केला होता. ताळ हाताप्रमाने पिकाची जोपासना केली मात्र, निसर्गाची अवकृपा राहिली आणि सोयाबीन पाण्यातच जाणार असे चित्र सध्या त्यांच्या शेतामध्ये आहे.

Body:लातूर जिल्ह्यात खरिपातील प्रमुख पीक हे सोयाबीन आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने संबंध हंगामाच धोक्यात होता. मात्र, अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी या पिकांची जोपासना केली खरी...परंतु ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. गेल्या 15 दिवसांपासून रोजच पाऊस बरसत असल्याने काढणी झालेली पिके शातमध्येच आहेत तर काही ठिकाणी गुडघ्याभर पाण्यात हे पीक आहे. खरिपाचे पूर्णतः नुकसान झाले असून आता पंचनामे आणि कोणतीही औपचारिकता न करता सरसकट प्रति हेक्टरी 50 हजरांची मदत करण्याची मागणी लातूर ग्रामीण भागातील शेतकरी करीत आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून लावकर उघडीप न झाल्यास खरीपापाठोपाठ रबीवरही धोक्याची घंटा मानली जात आहे.परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने रबीला उशिराने सुरवात होणार आहे. यातच उघडीप न दिल्यास स्थिती अधिकच बिकट होणार आहे. मात्र, सध्याची अवस्था पाहता शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे.

Conclusion:गातेगाव परिसरात तब्बल 13 हेक्टरववरील पिकांची ही अवस्था आहे. काही ठिकाणी साठवून ठेवलेल्या पिकानाच मोड लागले आहेत तर काही पिके ही पाण्यातच ही भीषणता आहे लातूर जिल्ह्यातील.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.