ETV Bharat / state

गणेश उत्सवात ना ढोल ताशांचा गजर, ना विद्युत रोषणाई; व्यावसायिकांवरचे विघ्न कायम - Band squad business

दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळाकडून १० ते १२ फूट ऊंचीच्या मूर्त्यांची चार महिने अगोदरच बुकींग केली जात असे. यंदा पाच फूटाहून मोठी मूर्तीही मिळणार नाही. दुसरीकडे आकर्षक विद्युत रोषणाई आणि मंडपाची कलाकृती सादर करून, या उत्सवात मंडप व्यवसायिक नवचैतन्य आणत असतात. पंरतु गेल्या पाच महिन्यापासून त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे दरवर्षीचा उत्साह यंदा कुठेतरी हरपला असल्याचे चित्र आहे.

corona affected pavilion and Band squad business
गणेश मुर्ती
author img

By

Published : Aug 17, 2020, 4:39 PM IST

लातूर - चार महिन्याच्या लग्न सराईत मंडप व्यवसायिकांच्या हाताला एक काम मिळाले नाही. लग्न सराईच्या पहिल्या तिथीलाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. आज आलेले संकट उद्या दूर होईल, असा आशावाद मंडप डेकोरेट, बॅण्ड-बाजा पथक यासारख्या व्यवसायिकांना होता. मात्र, पाच महिन्यानंतर ही हे संकट कायम आहे. आता गणेश उत्सव चार दिवसांवर आहे. मात्र, शासनाच्या नियमावलीनुसार मिरवणूक काढता येणार नाही. या उत्सवात देखील या व्यवसायिकांवरील विघ्न कायम आहेत.

लातूर शहरात जवळपास ८० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. गणरायाचे आगमन होण्यापूर्वी १० ते १५ दिवस गणेश भक्तांनी लगबग सुरू असते. तर दुसरीकडे मंडप आणि सजावटीच्या कामात शेकडो हात गुंतलेले असतात. यंदा मात्र कोरानाच्या संकटामुळे सर्व काही ठप्प आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तीच्या विक्रीला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे विक्रेत्यांनी ऑनलाईनद्वारे गणेश मूर्ती घरपोच करण्याची सोय केली आहे.

दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळाकडून १० ते १२ फूट ऊंचीच्या मूर्त्यांची चार महिने अगोदरच बुकींग केली जात असे. यंदा पाच फूटाहून मोठी मूर्तीही मिळणार नाही. दुसरीकडे आकर्षक विद्युत रोषणाई आणि मंडपाची कलाकृती सादर करून, या उत्सवात मंडप व्यवसायिक नवचैतन्य आणत असतात. पंरतु गेल्या पाच महिन्यापासून त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे दरवर्षीचा उत्साह यंदा कुठेतरी हरपला असल्याचे चित्र आहे.

गणेश उत्सवात ना ढोल ताशांचा गजर, ना विद्युत रोषणाई...

लॉकडाऊनमुळे गणेश मूर्ती बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची देखील खरेदी हे मूर्तीकार करू शकलेले नाहीत. त्यामुळे मागणी जास्त पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण होणार आहे. परिणामी यंदा २० ते ३० टक्यांनी मूर्त्यांचे दर वाढलेले आहेत. पाच महिन्यापासून असलेले कारोनाचे संकट विघ्नहार्ता तरी दूर करेल अशी आशा होती. पण दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने या उत्सवावर देखील नियम-अटी घालण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदा गणरायाचे दणक्यात होणार नाही आणि विसर्जन मिरवणूकाही काढता येणार नाहीत. यामुळे उत्सवादरम्यान ज्या शेकडो हाताना काम मिळत असते त्यांच्यावरील विघ्नही कायम राहणार हे नक्की.

हेही वाचा - उदगीरसाठी स्वतंत्र यंत्रणा राबवा, सर्वतोपरी मदत केली जाईल - पालकमंत्री अमित देशमुख

हेही वाचा - लातुरात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन, जुन्या शासकीय इमारतीत दररोज होणार विक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.