लातूर : लातूर जिल्ह्यातील मुरुडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत अमर पुंडलिक नाडे (वय 45 वर्ष) यांचे (Amar Nade) आकस्मात निधन झाले आहे. मयत अमर यांच्या पत्नी अमृता नाडे या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ मुरुड शहरातील सार्वजनिक चौकात त्यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली (Death In Public Campaign) होती.
रुग्णालयात उपाचारार्थ दाखल : प्रचाराची जाहीर सभा सुरु असताना अमर नाडे हे भाषण करताना अचानक स्टेजवर (Gram Panchayat Election meeting in latur) कोसळले. त्यांना तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपाचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचे लातूरच्या स्वर्गीय विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी 'ई-टीव्ही भारत'शी दुरध्वनीवरुन बोलताना सांगितले (death in Gram Panchayat Election meeting in latur) आहे.
निवडणूकांचा प्रचार : लातुर जिल्ह्यातील 351 पैकी 337 ग्रामपंचायत निवडणूकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातील 14 ग्रमपंचायती बिनविरोध निवडून आल्या असून 16 सरपंच व 399 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडले आहेत. सर्व स्तरावर ग्रामपचायत सदस्यांना मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी उमेदवार प्रचार करत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान लातूर जिल्ह्यातील ही घटना असून मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे ते जवळचे नातेवाईक (Gram Panchayat Election latur) आहेत.