कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात विहीर खचल्यामुळे 6 जण गाडले गेले होते. यांपैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, तिघेजण अजूनही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बुल्डोजरच्या साहाय्याने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. ही घटना आज (शनिवारी) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली.
दोन बुल्डोजर आणि एका क्रेनच्या साहाय्याने अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. विहिरीचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अमोल सदाकळे, सिकंदर जमादार आणि विहीर मालक वारकरी हे तिघे अजूनही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तर, जखमींमध्ये नेताजी पाटोळे, बापू संजय यशवंत यांसोबत आणखी एकाचा समावेश आहे.