ETV Bharat / state

कोल्हापूर : हस्तीदंत तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; वनविभागाची कारवाई

author img

By

Published : Mar 11, 2021, 9:47 AM IST

कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीनफिल्ड परिसरात हस्तीदंत विक्रीसाठी येणाऱ्या तिघांना आज कोल्हापूर वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हस्तीदंताचे सुमारे ९६५ ग्राम वजनाचे तीन नग सापडले आहे.

three-arrested-for-ivory-smuggling-in-kolhapur
कोल्हापूर : हस्तीदंत तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; वनविभागाची कारवाई

कोल्हापूर - हस्तीदंत विक्रीसाठी येणाऱ्या तिघांना आज कोल्हापूर वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हस्तीदंताचे सुमारे ९६५ ग्राम वजनाचे तीन नग सापडले आहे. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीनफिल्ड परिसरात ही कारवाई करण्यात आली. माणिक विलासराव इनामदार (५९) रा. परळी निनाई ता. शाहूवाडी, सागर आबासाहेब साबळे (३२) रा. माले ता. पन्हाळा, धनंजय केरबा जगदाळे (२१) रा. शिंगणापूर ता. करवीर, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सापळा रचत केली कारवाई -

कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीनफील्डजवळ काही जण हस्तीदंत विक्रीसाठी येणार असल्याचे माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर कोल्हापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळ रचला. त्यानंतर या तीघांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन हस्तीदंतासह एक इनोव्हा गाडी क्रमांक एमएच 09 एक्यू 6661, एक दुचाकी हिरो होंडा स्प्लेंडर एमएच 09 डीडब्ल्यू 4750 व तीन मोबाईल जप्त केली.

हेही वाचा - महाशिवरात्रीनिमित्त परळी वैजनाथ मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त; पायरी दर्शनासही मनाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.