ETV Bharat / state

कागल तालुक्यात रविवारपासून दहा दिवस कडक जनता कर्फ्यू

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांसोबत कागलमध्ये बैठक घेतली. कागल तालुक्यात येत्या रविवारपासून 19 एप्रिलपर्यंत दहा दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याच्या ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहे.

author img

By

Published : May 7, 2021, 9:24 PM IST

आढावा बैठक
आढावा बैठक

कोल्हापूर - कागल तालुक्यात येत्या रविवारपासून 19 एप्रिलपर्यंत दहा दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याच्या ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांसोबत कागलमध्ये बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला प्रांताधिकारी प्रसेन्नजित प्रधान, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील आदी उपस्थित होते. ज्या तालुक्यात बाधितांची संख्या वाढत आहेत, त्या तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. जनता कर्फ्यू अत्यंत कडक करा, कुणालाही बाहेर पडू देऊ नका, अशा सूचनाही पोलीस अधिकाऱ्यांना मुश्रीफ यांनी यावेळी दिल्या.

'''हे'' सुरू ठेवा'

यावेळी मुश्रीफ म्हणाले, कडक जनता कर्फ्युच्या या दहा दिवसांच्या काळात दूध व औषध दुकाने या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. तसेच पेट्रोल पंप फक्त अत्यावश्यक सेवांना पेट्रोल देण्यासाठीच सकाळी सुरू राहतील. तालुक्यातील कसबा सांगाव, व्हन्नुर व वंदूर या गावांमध्ये बाधितांची संख्या जास्त आहे. या गावांना रेड अलर्ट एरिया जाहीर करून अँटिजेन व आरटीपीसीआर टेस्टसह लसीकरणही वाढवा, अशा सूचनाही मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

दवाखान्यांमध्ये बेडसह औषधांचीही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे घरात राहून संसर्गाची साखळी तोडणे हेच आपल्या हातात आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा विषाणू अधिक गंभीर असल्याचे सांगत संसर्ग झाल्यापासून सहावा, सातवा व आठवा हे तीन दिवस फार धोक्याचे असतात. कोणतेही लक्षण दिसताच तात्काळ चाचणी करा. कोरोनाच्या लक्षणांचा रुग्ण आल्यास खासगी डॉक्टरांनीही तत्काळ चाचणी करण्याचा सल्ला द्यावा. तसेच ही माहिती तत्काळ शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी. अन्यथा, खासगी डॉक्टरांवरही कारवाई केली जाईल, अस इशारा मुश्रीफ यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.