कोल्हापूर - पावसाळ्यापूर्वी पानगळ होत असते, नविन पालवी फुटत असते. आता सुद्धा शिवसेनेत ( Siv sena ) पानगळ झाली आहे. त्यामुळे नवीन पालवी फुटण्यासाठी यांनी संधी दिली आहे. त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो असे, शिवसेनेचे जेष्ठ नेते दिवाकर रावते ( Diwakar Raote ) यांनी म्हंटले आहे. ते कोल्हापूरात पत्रकारांशी बोलत होते.
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांशी गाठीभेटी सुरू असून ते आज कोल्हापूरात कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोल्हापूरात आयोजित बैठकीसंदर्भात माहिती दिल्यानंतर इतर विषयांवर बोलणे दिवाकर रावते यांनी टाळले. आता केवळ आगामी निवडणुकांबाबतच्या ( Upcoming elections management ) नियोजनासाठी बैठक असून त्यासंदर्भात चर्चा होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - MH Political Crisis : धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे निवडणूक आयोगासमोर आमनेसामने