कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार सुरुवात झाली असून पंचगंगा नदीच्या पात्रात झपाट्याने देखील वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात देखील पाऊस जोरदार झाल्याने धरणाचा पाणी साठ्यात वाढ होत आहे. आज सकाळी ६ वाजता पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा वरील पाण्याची पातळी आज सकाळी सात वाजता 31 फूट इतकी होती, तर जिल्ह्यातील एकूण बत्तीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील अनेक मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुुरू आहे. तर कोल्हापूर गगनबावडा या राज्य मार्गावर पाणी आल्याने कोकणात जाणारी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फुटांवर आहे. गत साली आलेल्या प्रचंड महाप्रलयामुळे नागरिकांच्यामध्ये भीती निर्माण झाली असून नागरिकांनी देखील पंचगंगा नदीचे पाणी यंदा पात्राबाहेर पडताच स्थलांतरासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर, काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर गगनबावडा या राज्य मार्गावर पाणी आल्याने कोकणात जाणारी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फुटांवर आहे.