ETV Bharat / state

'सारथी संस्थेबाबत चाललेला पोरखेळ थांबवावा'

author img

By

Published : Jul 3, 2020, 7:07 PM IST

मी कोणत्या पक्षाची भूमिका मांडत नाही. सारथी संस्था ही शाहू महाराज यांच्या नावाने उभारली आहे. मात्र, सारथीची स्वायत्तता जी होती ती आज आहे का? संस्थेचा जो उद्देश आहे त्यावर संस्था चालते का, असा सवाल उपस्थित होत असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

mp-sambhaji-raje-chhatrapati-comment-on-sarthi-trust-in-kolhapur
'सारथी संस्थेबाबत चाललेला पोरखेळ थांबवावा'

कोल्हापूर- सारथी संस्थेबाबत सुरू झालेल्या राजकारणावर आज खासदार संभाजीराजे अखेर संतापले. संस्थेच्या बाबत विविध मागण्यांसाठी आम्ही पुण्यात आंदोलन केले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या. मात्र त्याला १० महिने उलटले तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे संस्थेबाबत चाललेला पोरखेळ थांबवावा, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. आज कोल्हापुरात ते बोलत होते.

मी कोणत्या पक्षाची भूमिका मांडत नाही. सारथी संस्था ही शाहू महाराज यांच्या नावाने उभारली आहे. मात्र, सारथीची स्वायत्तता जी होती ती आज आहे का? संस्थेचा जो उद्देश आहे त्यावर संस्था चालते का, असा सवाल उपस्थित होत असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.पुण्यातील आंदोलनाला 10 महिने झाले. आदोलनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी सारथी संस्थेचे विविध प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हा पोरखेळ थांबवावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करावा. मी कोणत्याही पक्षाच्या वतीने भूमिका मांडत नाही. सारथी संस्थेत ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई करा, मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, अशी माझी इच्छा माझी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी लढा देत आहे, असे संभाजीराजेंनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.