ETV Bharat / state

दादांना वाटतंय सगळं जग ताब्यात असले पाहिजे; मात्र निकालातून चपराक - सतेज पाटील

गेल्या अनेक वर्षांत भाजपने अनेक चुकीची धोरणे राबवली. शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे केले. अनेक युवक बेरोजगार झाले, त्यामुळे या चुकीच्या धोरणांच्या विरोधात नागरिक असल्याचे स्पष्ट झाले असल्याचेही यावेळी सतेज पाटील यांनी म्हटले.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Dec 5, 2020, 4:35 PM IST

कोल्हापूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वाटते, सगळे जग आपल्या ताब्यात असले पाहिजे. मात्र, विधान परिषदेच्या या निकालातून त्यांना चांगलीच चपराक बसली असल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले आहे. शिवाय या निकालातून सुशिक्षित पदवीधर मतदारांनी भाजपला नाकारल्याचे स्पष्ट झाले असल्याचेही ते म्हणाले. निवडणुकीपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी भाजप एकटा पक्ष सर्वांना पुरून उरेल, असे म्हटले होते. त्यानंतर सतेज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कोल्हापूर

भाजपच्या धोरणांच्या विरोधात नागरिक -

गेल्या अनेक वर्षांत भाजपने अनेक चुकीची धोरणे राबवली. शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे केले. अनेक युवक बेरोजगार झाले, त्यामुळे या चुकीच्या धोरणांच्या विरोधात नागरिक असल्याचे स्पष्ट झाले असल्याचेही यावेळी सतेज पाटील यांनी म्हटले.

लोकांनी त्यांच्या मागे फरफटत यावे अशी त्यांची धारणा -

लोकांनी भाजपच्या मागे फरफटत यावे, अशी त्यांची धारणा आहे. केवळ लोकांना गृहीत धरणे हेच त्यांनी केले, त्यांचे प्रश्न सोडवले नाहीत. 2014 साली सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी केंद्रातील सत्ता मिळवली. आता त्यांनी जे पेरले होते तेच उगवले असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटले. शिवाय महाविकास आघाडीने चांगली मोट बांधत विधानपरिषदेत चांगले यश मिळवले असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.