ETV Bharat / state

कोल्हापूर; कामगारमंत्र्यांचा दावा फोल, परप्रांतीय कामगारांनी धरली घरची वाट

author img

By

Published : Apr 16, 2021, 12:13 PM IST

Updated : Apr 16, 2021, 1:35 PM IST

कोल्हापुरात एमआयडीसीमध्ये काम करणारे अनेक कामगार हे झारखंड आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. कोल्हापुरातून त्यांना जाण्यासाठी आठवड्यातून एकच रेल्वे उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परप्रांतीय कामगारांनी काल रात्रीपासून रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती.

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर- कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी परप्रांतीय कामगारांची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांचा दावा फोल ठरवत कोल्हापुरातील परप्रांतीय कामगारांनी घरची वाट धरली आहे. जवळपास १० हजारपेक्षा जास्त कामगारांनी या चार दिवसात कोल्हापूर सोडलं आहे. रेल्वेचे तिकीट काढून देखील कामगारांना रेल्वे स्थानकातून हाकलून लावण्यात आले. त्यामुळे खासगी वाहनांतून हे कामगार आपल्या गावाकडे रवाना झाले.

परप्रांतीय कामगारांनी धरली घरची वाट

हेही वाचा - VIDEO : धारणीत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत

परप्रांतीय कामगारांनी धरली घरची वाट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक द चैन' या नियमांतर्गत राज्य सरकारने पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर दुकाने आणि उद्योग बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्याची धास्ती घेऊन परप्रांतीय कामगारांनी पुन्हा एकदा आपल्या घरची वाट धरली आहे. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी परप्रांतीय कामगारांनी महाराष्ट्र सोडू नये तुमची काळजी घेतली जाईल, असे आवाहन केलं होते. मात्र, कोल्हापुरात या कामगारांना रेल्वे स्थानकातून हाकलून लावल्याचा प्रकार घडला आहे.

झारखंड आणि उत्तर प्रदेशातील कामगारांची संख्या जास्त

कोल्हापुरात एमआयडीसीमध्ये काम करणारे अनेक कामगार हे झारखंड आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. कोल्हापुरातून त्यांना जाण्यासाठी आठवड्यातून एकच रेल्वे उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परप्रांतीय कामगारांनी काल रात्रीपासून रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती. अनेकांनी तिकीट काढली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने गर्दीमुळे या कामगारांना प्रवास करण्यापासून रोखले. त्यामुळे कामगार संतप्त झाले आहेत. अनेक कामगारांना आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. अनेकांनी कोरोनाच्या भीतीने खाजगी वाहन करून आपल्या घराकडे रवाना झाले. जवळपास जिल्ह्यातील दहा हजार पेक्षा जास्त कामगारांनी या चार दिवसात कोल्हापूर सोडले आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या महामारीत मरण झाले स्वस्त; स्मशानभूमीत चितांची ज्वाला शमता शमेना

Last Updated : Apr 16, 2021, 1:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.