ETV Bharat / state

Uday Samant : कोल्हापूर विमानतळावरून पहिल्यांदाच विमान उड्डाण ; उदय सामंत खासगी विमानाने तिरुपतीला रवाना - कोल्हापूर विमानतळावरून पहिल्यांदाच लाईट टेक ऑफ

कोल्हापूर विमानतळावरून पहिल्यांदाच एका विमानाने रात्रीचे उड्डाण ( Night flight by plane ) घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या दिवसाची कोल्हापूर विमानतळाला प्रतीक्षा होती. उद्योगमंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) आणि त्यांच्या परिवाराने कोल्हापूरातून तिरुपतीकडे खाजगी विमानाने प्रवास केला.

Uday Samant
कोल्हापूर विमानतळावरून पहिल्यांदाच लाईट टेक ऑफ
author img

By

Published : Nov 14, 2022, 8:55 AM IST

Updated : Nov 14, 2022, 9:36 AM IST

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरून पहिल्यांदाच एका विमानाने रात्रीचे उड्डाण ( Night flight by plane ) घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या दिवसाची कोल्हापूर विमानतळाला प्रतीक्षा होती. ती अखेर पूर्ण झाली असून लवकरच नाईट लँडिंग सुविधेचा माध्यमातून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. उद्योगमंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) आणि त्यांच्या परिवाराने कोल्हापूरातून तिरुपतीकडे खाजगी विमानाने प्रवास केला. रात्री 8 वाजून 46 मिनिटांनी विमानाने टेक ऑफ केले ( plane took off ). त्यामुळे आता खऱ्या अर्थाने नाईट लँडिंग सुविधेचा वापर सुरू झाला आहे.

कोल्हापूर विमानतळावरून पहिल्यांदाच लाईट टेक ऑफ

अन् मंत्री उदय सामंत यांच्या खाजगी विमानाने तिरुपतीकडे घेतले उड्डाण : डिजीसीए च्या परवानगीनंतर आणि एपीआय प्रणालीवर विमानतळाबाबतची माहिती प्रसिद्ध झाल्याने विमानतळ व्यवस्थापणाने 3 नोव्हेंबर पासून विस्तारित धावपट्टीचा तसेच नाईट लँडिंग सुविधेचा वापर सुरू केला. मात्र या विमानतळावरून कोणत्याही विमान कंपनीने किंव्हा खासगी वापरकर्त्यांनी याबाबत नाईट लँडिंग आणि टेक ऑफ साठी मागणी केली नव्हती. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत विमानतळ प्रशासनाला तिरुपतीकडे आपण जाणार असल्याबद्दल माहिती दिली. त्यानुसार 13 नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास खाजगी विमानाने तिरूपतीकडे उड्डाण घेतले.

सेवा देण्यास विमानतळ सज्ज : नाइट लँडिंग सुविधेचा रविवारी प्रत्यक्षात वापर झाला. या सुविधेचा पहिल्यांदाच वापर होणार असल्याने एअर फिल्डवरील लाईटिंग, वीजेचा पुरवठा, धावपट्टी, सुरक्षितता, आदींची तपासणी केली. विमानाचे सुरक्षितपणे आणि वेळेत टेकऑफ झाले. सुरक्षित सेवा देण्यास विमानतळ सज्ज असल्याचे कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले.

Last Updated : Nov 14, 2022, 9:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.