ETV Bharat / state

कोल्हापुरात 'नो शेव्ह नोव्हेंबर' मोहिमेद्वारे 4 कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत

गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापुरातील काही तरुणांकडून महिनाभर दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून साठलेली रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येते. यंदा या तरूणांनी 50 हजारांहून अधिक रक्कम गोळा करून ती 4 कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना दिली आहे.

kolha
कोल्हापुरात 'नो शेव्ह नोव्हेंबर' मोहिमेद्वारे 4 कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत
author img

By

Published : Dec 4, 2019, 3:16 PM IST

कोल्हापूर - गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापुरातील काही तरुण 'नो शेव्ह नोव्हेंबर' ही मोहिम राबवतात. महिनाभर दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून साठलेली रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येते. यंदा या तरुणांनी 50 हजारांहून अधिक रक्कम गोळा करून ती 4 कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना दिली आहे.

कोल्हापुरात 'नो शेव्ह नोव्हेंबर' मोहिमेद्वारे 4 कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत

किरण गीते यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतःचे केस कॅन्सरग्रस्त महिलेसाठी दान केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन नो शेव्ह नोव्हेंबर गृपकडून त्यांना यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात किरण गीते यांच्या हस्ते आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, सचिव मनजीत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली.

हेही वाचा - कॅन्सरग्रस्तांसाठी युवतीने केले आपले केस दान

जगभरात नोव्हेंबर महिन्यात ही मोहीम सुरू असते. याचेच अनुकरण कोल्हापुरातील तरुणांनी करायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी व्हाट्सअ‌ॅप ग्रुपच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचे काम सुरू केले. या मोहिमेला चारशेहून अधिक तरुणांनी पाठिंबा दिला आहे.

यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा दुपटीने प्रतिसाद मिळाल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले आहे. या तरुणांनी ज्या पद्धतीने ही मोहीम हाती घेतली त्याचे कौतुक वाटत असल्याच्या भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत. यापुढेही या ग्रुपच्या माध्यमातून हे काम सुरू ठेवण्याचा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला आहे.

Intro:अँकर : गेल्या एक महिन्यापासून कोल्हापूरात नो शेव्ह नोव्हेंबर ही मोहीम खुपच चर्चेत आहे. कारण कोल्हापुरातल्या काही तरुणांनी नो शेव्ह नोव्हेंबर या एका मोहिमेसाठी दाढी वाढवली होती. महिनाभर दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून साठलेली रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली. कोल्हापुर प्रेस क्लब कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात किरण गीते यांच्या हस्ते आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, सचिव मनजीत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली. Body:व्हीओ 1 : गेल्या वर्षी पासून सुरू झालेल्या नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेत यावर्षी अनेक तरुणांनी सहभाग नोंदवला. खरंतर जगभरात नोव्हेंबर महिन्यात ही मोहीम सुरू असते याचेच अनुकरण कोल्हापुरातील तरुणांनी करायचे ठरविले. त्यानुसार त्यांनी व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचे काम सुरू केले. त्यांच्या या मोहिमेला कोल्हापुरातील दोनशेहून अधिक तरुणांनी पाठिंबा दिला. याअंतर्गत महिनाभर दाढी केली गेली नाही. दाढी करण्यासाठी जेव्हढे पैसे खर्च होतात ते वाचवून ती रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी द्यायची या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली होती. त्याला गेल्या वर्षीपेक्षाही अधिक प्रतिसाद यावर्षी मिळाल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी म्हंटल आहे.

बाईट - गीतेश डकरे, ग्रुप सदस्य

व्हीओ 2 : यंदा या मोहिमेचे दुसरं वर्षे होतं. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मोहीमेत तरुणांचा दुपटीने सहभाग होता. जवळपास 400 हुन अधिक तरुण मोहिमेत सक्रिय झाले असून ग्रुपच्या माध्यमातून 50 हजारांहुन अधिक रक्कम गोळा करण्यात आली. 4 कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना ही जमा झालेली मदत देण्यात आली. कोल्हापूरात अशा पद्धतीची मोहीम यापूर्वी कधीच पहिली नाही. पण या तरुणांनी ज्या पद्धतीने ही मोहीम हाती घेतली आहे याचे खुप कौतुक वाटत असल्याच्या भावना काही कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या.

बाईट - रुग्णांचे नातेवाईक

व्हीओ 3 - सुरुवातीला या मोहिमेबद्दल माहिती मिळाल्यानंतर दर्शन शहा यांनी हा विचार त्याच्या मित्रमंडळींना बोलून दाखवला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे हजारो रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी आपण ही मोहीम सुरू करू असा निर्णय सर्वांनी केला. त्यानुसार यंदा सलग दुसऱ्या वर्षी ही मोहीम अगदी उत्साहाने राबविण्यात आली. विशेष म्हणजे यावर्षी परभणीमधील किरण गीते या युवतीच्या हस्ते जमा झालेली रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली. किरण गीते यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतःचे केस कॅन्सरग्रस्त महिलेसाठी दान केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन येथील नो शेव्ह नोव्हेंबर ग्रुपकडून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मोहीम सुरू झाली असल्याने सोशल मीडियाचा असाही वापर करणारे तरुण समाजात आहेत याचे कौतुक वाटत असल्याचे किरण गीते यांनी म्हंटलंय..

बाईट - किरण गीते

व्हीओ 4 : कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या वेदना वाटून घेता येत नसल्या तरी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करता येऊ शकते. हा विचार घेऊन ही मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या जोमाने यावर्षी पार पडली आणि यापुढेही या ग्रुपच्या माध्यमातून असेच जोमाने काम करू असा विश्वास ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केला.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.