कोल्हापूर- जगभरात कोरोना विषाणूमुळे हजारो लोकांनी आपले जीव गमवले आहे. राज्यातही आतापर्यंत कोरोनाचे १०१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, ग्रामीण भागातील लोकांनी देखील खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ हे गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.
गावात प्रवेश देणारे तिन्ही रस्ते बंद ठेवण्यात आले आहे. रस्त्यांवर दगड टाकून बाहेरील व्यक्तीस गावात प्रवेश नाकारण्यात आला आहे. इंचनाळ प्रमाणेच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.
हेही वाचा- Exclusive : शाहीर नायकवडी गातो पोवाड्याला.. एकदा ऐकाच, कोरोनासंदर्भात जनजागृती