ETV Bharat / state

Donkey Wedding In Kolhapur: कोल्हापुरात पावसासाठी गावकऱ्यांनी लावले चक्क गाढवाचे लग्न; Watch Video

कोल्हापूर जिल्ह्यात भरपूर पाऊस पडावा यासाठी गावकऱ्यांनी चक्क गाढवाचे लग्न लावून दिले आहे. या लग्नाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू असून अगदी वरात काढत हे लग्न लावून देण्यात आले आहे.

Donkey Wedding In Kolhapur
गाढवाचे लग्न
author img

By

Published : Jul 16, 2023, 9:27 PM IST

पावसासाठी गाढवाचे लग्न लावताना गावकरी

कोल्हापूर: जिल्ह्यात सध्या पावसाळा सुरू असून देखील म्हणावा तसा पाऊस झालेला नाही; परिणामी महापुराचा सामना करणाऱ्या या जिल्ह्यात अद्याप देखील धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहे. अशातच करवीर तालुक्यातील तामगाव या गावात पाऊस पडावा यासाठी शेतकरी व ग्रामस्थांनी चक्क गाढवाचे लग्न लावून दिले. या लग्नाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू असून अगदी वरात काढत हे लग्न लावून देण्यात आले आहे.

कोल्हापूर: गाढवाचं लग्न लावल्यानंतर भरपूर पाऊस पडतो, अशी अनेक जणांची श्रद्धा आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत नसल्याने चिंताग्रस्त झालेला शेतकरी आता देवापुढे प्रार्थना करू लागला आहे. तर कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील तामगाव गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रद्धेपोटी पारंपरिक पद्धतीने मंगलाष्टकासह अक्षता टाकत गाढवाचे लग्न लावले आहे. या आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्यासाठी संपूर्ण गावातील शेतकरी, आबालवृद्ध व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी नवरदेव व वागदत्त वधूची संपूर्ण गावातून धनगरी ढोल व हलगी या वाद्यांसह मिरवणूक काढण्यात आली. तसेच गावातील सर्व मंदिरात जाऊन देवतांना जलाभिषेक घालण्यात आला आणि भरपूर पाऊस पडण्याची प्रार्थना करण्यात आली.

कोल्हापुरातील ही पहिलीच घटना: एकीकडे देशात अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना कोल्हापुरात मात्र शेतकऱ्यांना पावसाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. गावकरी आता पाऊस पडावा म्हणून असे वेगवेगळे उपाय करताना पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पावसासाठी गाढवाचे लग्न लावण्याची ही पहिलीच घटना असल्याची चर्चा सुरू आहे. यावेळी या लग्नासाठी सरपंच सुरेखा हराळे, उपसरपंच महेश जोंधळेकर, गिता जोंधळेकर, राजू पावंडे, कृष्णा जोंधळेकर, अमर शिंदे, विकास नलवडे, विश्वास शिंदे, प्रभाकर सासणे, बाबासो पाटील, माणिक जोंधळेकर हे ज्येष्ठ मंडळी लहान मुले व महिला यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धरणातील पाणीसाठी खालावला: कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस कमी पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा झाला आहे. यामुळे देवाला प्रार्थना करा. वेळ पडली तर गाढवाचं लगीन लावा, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल झालेल्या मेळाव्यात म्हटले होते. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज गावकऱ्यांनी एकत्र येत हे आगळ्यावेगळ्या पद्धतीने गाढवाचे लगीन लावल्याने या लग्नाची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.