कोल्हापूर - गोकुळ आणि मुंबई एक वेगळं समीकरण आहे. एकट्या मुंबईमध्ये दररोज 1 लाख लिटर पेक्षाही अधिक दुधाची विक्री होते. यासाठी दुधाचे पॅकिंग आणि (शीतगृह) चिलिंग सेंटरसाठी शासनाने 10 एकर जागा द्यावी, अशी मागणी गोकुळच्या नूतन अध्यक्षांसह सर्वच संचालकांनी केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच मंत्री आणि महत्वाचे नेते मंडळींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुंबईत भेट घेऊन ही मागणी केली आहे. त्यानुसार सरकार सकारात्मक असून सिडकोची 5 एकर जागा देऊ, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईत 'गोकुळ'चा दबदबा वाढणार -
कोल्हापुरातील तीनही मंत्र्यांनी गोकुळच्या नूतन संचालक मंडळासह गुरुवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांची भेट घेतली. गोकुळच्या दुधाची मुंबईत होणारी दररोजची विक्री पाहता गोकुळला मुंबईत जागेची गरज आहे. त्यानुसार तब्बल 10 एकर जागेची संचालक मंडळाने मागणी केली. मात्र सिडकोची 5 एकर जागा देता येईल, असे म्हणत त्यावेळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करून जागा निश्चित करण्याबाबत सुचना दिल्याची माहिती मिळत आहे. शिवाय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा महानंदकडील थकीत पावणेदोन कोटी रुपये देऊ केले असल्याचे समजते. इतकेच नाही तर प्रकल्प अनुदानासाठीचा फेरप्रस्ताव पशुसंवर्धन विभागाने तातडीने पाठवा त्याला अर्थखाते मंजुरी देईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. गोकुळ दूध संघाचा यापूर्वी सुद्धा मुंबईत दबदबा होता मात्र आता शितगृह, पॅकिंग आणि मार्केटिंगसाठी त्यासाठी जागा मिळाल्यानंतर गोकुळचा अधिकच दबदबा निर्माण होणार आहे. स्वतः पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुद्धा यापूर्वी अनेकदा मुंबईत गोकुळचा दबदबा निर्माण करण्याबाबत सूतोवाच केले होते. त्यानुसार सत्ता मिळाल्यानंतर हालचाली सुद्धा सुरू झाल्या आहेत.
'गोकुळ'चा दबदबा आता मुंबईत.. सिडकोची पाच एकर जागा मिळणार
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच मंत्री आणि महत्वाचे नेते मंडळींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुंबईत भेट घेऊन दुधाचे पॅकिंग आणि (शीतगृह) चिलिंग सेंटरसाठी शासनाने 10 एकर जागा द्यावी ही मागणी केली आहे. त्यानुसार सरकार सकारात्मक असून सिडकोची 5 एकर जागा सुद्धा देऊ, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याची माहिती मिळत आहे.