कोल्हापूर - समरजितसिंह घाडगे यांच्या उपोषणाची दखल घ्या अन्यथा या मोहिमेला मोठ्या आंदोलनाचे स्वरूप यायला वेळ लागणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांच्या कोल्हापुरात सुरू असलेल्या उपोषणाची देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. कोल्हापूरतल्या ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर हे उपोषण सुरू आहे.
काय म्हणाले फडणवीस -
सरकारच्या मोघलाई विरोधात समरजितसिंह घाटगे यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, असे म्हणत फडणवीस यांनी आंदोलनाचे समर्थन केले. तसेच सरकारने याची तत्काळ दखल घेत आंदोलन संपवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा - LIVE : समरजितसिंह घाटगे यांचे सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी कोल्हापुरात लाक्षणिक उपोषण
दरम्यान, राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी ते उपोषण करणार असल्याचे म्हणाले होते.